शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

मेडिकल : दारुच्या बॉटल्समुळे विभाग प्रमुख अडचणीत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 21:10 IST

मेडिकलच्या अधिष्ठाता कार्यालयामागील भागात कचऱ्याच्या टबमध्ये रिकाम्या दारूच्या बॉटल्सचा ढीग आढळून आल्याने खळबळ उडाली. अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांनी याची गंभीर दखल घेतली.

ठळक मुद्देअधिष्ठात्यांनी घेतली गंभीर दखल : विभाग प्रमुखांना विचारला जाब

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : शासकीय रुग्णालयात किंवा कार्यालयात मद्यपान करणे हा गुन्हा ठरतो. मात्र सोमवारी चक्क मेडिकलच्या अधिष्ठाता कार्यालयामागील भागात कचऱ्याच्या टबमध्ये रिकाम्या दारूच्या बॉटल्सचा ढीग आढळून आल्याने खळबळ उडाली. अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांनी याची गंभीर दखल घेतली. या विषयी मंगळवारी विभाग प्रमुखांना पत्र देऊन जाब विचारला. यामुळे विभाग प्रमुख अडचणीत आले आहेत.मेडिकलमध्ये विदर्भासह आजूबाजूच्या राज्यातून रुग्ण येतात. शिवाय रुग्णालयाचा परिसर फार मोठा असल्याने सुरक्षा रक्षकांना सर्वच ठिकाणी लक्ष देणे अशक्य असते. याचा फायदा घेत काही रुग्णांचे नातेवाईक व समाजविघातक रुग्णालयाच्या परिसरात दारू पितात. काही वर्षापूर्वी वॉर्डाच्या भागात दारुच्या रिकाम्या बॉटल्स सापडल्या. याची चर्चा झाल्याने सफाई कर्मचाऱ्यांनाही याबाबत जाब विचारण्यात आला होता. नंतर मुलांच्या वसतिगृहात दारुच्या बॉटल्स सापडल्यानेही मेडिकल चर्चेत आले होते. आता अधिष्ठाता कक्षाला लागून असलेल्या कार्यालयाच्या मागील परिसात कचºयाचा टबमध्ये रिकाम्या दारूच्या बॉटल्स आढळून आल्याने पुन्हा एकदा उलटसुलट चर्चेला पेव फुटले आहे. रात्रीच्यावेळी मेडिकलच्या परिसरात दारूच्या पार्ट्या चालत असाव्यात, असा अंदाजही व्यक्त केला जात आहे. या प्रकाराला अधिष्ठाता डॉ. मित्रा यांनी गंभीरतेने घेत चौकशीचे आदेश दिले आहे. मंगळवारी कार्यालयीन विभाग प्रमुखांना ‘वॉर्निंग लेटर’ देऊन या विषयी जाबही विचारण्यात आला. कार्यालयाच्या परिसरात कोणी कर्मचारी मद्यपान करीत असेल तर त्याच्यावर कडक कारवाई करा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. सूत्रानूसार, सीसीटीव्ही कॅमेरेचे फुटेजही तपासले जाणार असल्याची माहिती आहे.

टॅग्स :Government Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयliquor banदारूबंदी