शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
2
भारतीय लष्कराकडून पुन्हा एकदा ड्रोन स्ट्राईक, अनेक अतिरेकी ठार झाल्याचा दावा
3
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
4
प्रियकरासोबत पत्नी वारंवार पळून जायची; घटस्फोट घेतला अन् दुधाने अंघोळ करुन आनंद साजरा केला
5
Video: IAS अधिकाऱ्याची परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्याला मारहाण; कॉपी केल्याचा आरोप
6
IND vs ENG : 'गलीतली साडेसाती' संपली; जैस्वालचा 'यशस्वी' झेल! दुसऱ्यांदा रेड्डीच्या जाळ्यात फसला क्रॉउली (VIDEO)
7
पिवळी साडी... शेत... मादक अदा... पाहा, भारतीय क्रिकेटरच्या बहिणीचे ग्लॅमरस PHOTOS
8
वडिलांनीच घेतला मुलाची जीव, हॉटेलमध्ये नेले, बेदम मारहाण केली आणि...  
9
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
10
"आतापर्यंत आम्ही एकट्याने निवडणुका लढवल्यात, आता…”, मनसे-ठाकरे गट युतीच्या चर्चांदरम्यान बाळा नांदगावकरांचं सूचक विधान 
11
आंद्रे रसेलच्या पत्नीने केला 'हटके' स्टाईल वर्कआऊट; जेसिमचा भन्नाट VIDEO होतोय व्हायरल
12
IND vs ENG : नाद करा, पण आमचा कुठं? DSP सिराजनं असा घेतला बेन डकेटचा बदला (VIDEO)
13
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
14
तुमचे १ कोटी रुपये किती दिवसात ५० लाख होतील? महागाईची हे गणित समजून घ्या, अन्यथा निवृत्तीनंतर पश्चात्ताप होईल!
15
लगाव बत्ती: 'राजे'नीती! रॉयल फॅमिली आणि शिवकालीन गनिमी कावा
16
RBI चा मोठा निर्णय! शेतकऱ्यांसह लघु उद्योजकांना होणार थेट फायदा? आता कर्ज मिळणे होणार सोपं
17
IND vs ENG : शतकाचा मोह नडला; स्ट्राइक देण्याच्या नादातच पंत ठरला 'बळीचा बकरा'; KL राहुल म्हणाला...
18
नाशिकमध्ये महिलेने पतीचा झोपेतच दाबला गळा, हत्या करून फेकले जंगलात; गावात खळबळ
19
धबधबे, बोटिंग आणि निसर्ग सौंदर्य; कांडवनला वर्षा पर्यटनासाठी पर्यटकांची गर्दी   
20
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा

मेडिकलची रक्तपेढी बंद

By admin | Updated: October 30, 2015 02:49 IST

आदर्श रक्तपेढीचा पुरस्कार मिळालेल्या मेडिकलच्या रक्तपेढीतील त्रुटींवर बोट ठेवत त्या दूर होईपर्यंत कामकाज बंद ठेवण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) बुधवारी सायंकाळी दिल्याने खळबळ उडाली आहे.

रुग्णसेवा अडचणीत : त्रुटी दूर झाल्यानंतरच सुरू करण्याचे एफडीएचे आदेशनागपूर : आदर्श रक्तपेढीचा पुरस्कार मिळालेल्या मेडिकलच्या रक्तपेढीतील त्रुटींवर बोट ठेवत त्या दूर होईपर्यंत कामकाज बंद ठेवण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) बुधवारी सायंकाळी दिल्याने खळबळ उडाली आहे. दररोज अत्यावश्यक उपचाराचे सुमारे हजार रुग्ण तसेच शंभराहून अधिक शस्त्रक्रिया होत असलेल्या या रुग्णालयाच्या रक्तपेढीचे अचानक कामकाज बंद पडल्याने रुग्णसेवा प्रभावित झाली आहे, तर ही ‘रुटीन अ‍ॅक्टिव्हिटी’ असल्याचे एफडीएचे म्हणणे आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रु ग्णालयाच्या (मेडिकल) दुरवस्थेबाबत नेहमीच ओरड होत असते. परंतु याच अपुऱ्या संसाधनाच्या बळावर राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेकडून (नॅको) मेडिकलच्या रक्तपेढीने सलग तीन वर्षे आदर्श रक्तपेढीचा पुरस्कार मिळविला आहे. खासगी रक्तपेढ्यांच्या स्पर्धेत दरवर्षी ११ हजारावर रक्तपिशव्यांचे संकलन करून गरीब रुग्णांना तत्काळ रक्त उपलब्ध करून देत आहे. मात्र, याच रक्तपेढीवर ‘एफडीए’ने त्रुटी काढल्या आहेत. रक्तपेढीची अयोग्य रचना, आरोग्यवर्धक नसलेले रक्त गोळा करण्याचे ठिकाण, अयोग्य पद्धतीने होत असलेले रक्तपिशव्यांवरील ‘लेबलिंग’ व ‘एलायझा रिडर’ मशीनमधील दोष, सेल्स कॉऊंट मशीन आणि पी.एच. मीटर मशीन नसल्याच्या या प्रमुख त्रुटी एफडीएने काढल्या आहेत. या त्रुटी दूर होईपर्यंत रक्तदात्यांकडून रक्त घेणे, रक्ताची तपासणी करणे व रक्त गोळा करण्याची प्रक्रिया थांबविण्याचे आदेश दिले आहे. यामुळे बुधवार सायंकाळी ५ वाजतापासून रक्तपेढीचे कामकाज बंद पडले आहे. विशेष म्हणजे, त्या पूर्वीपर्यंत तपासलेले रक्तपिशव्या रुग्णांना उपलब्ध करून देण्याचे आदेश एफडीएने दिले आहे. परंतु मागण्याच्या तुलनेत उपलब्ध रक्तपिशव्यांचा साठा फार कमी आहे, परिणामी गंभीर रुग्णांनाच रक्त उपलब्ध करून दिले जात असून सामान्य रुग्णांना याचा फटका बसत आहे.ज्या शक्य होत्या, त्या त्रुटी केल्या दूरसुत्राने दिलेल्या माहितीनुसार, २३ जून रोजी ‘एफडीए’ने रक्तपेढीची पाहणी केली तेव्हा त्यांनी काढलेल्या अनेक त्रुटी, उदा. रक्तपिशव्यांवरील ‘लेबलिंग’, स्वच्छतेवर विशेष लक्ष देऊन त्यात सुधारणा करण्यात आली. आवश्यक यंत्रसामग्रीसाठी संबंधित विभागाकडे प्रस्तावही पाठविला. सप्टेंबर महिन्यात एफडीएने पुन्हा तपासणी केली असता त्यांनी या गोष्टींचे कौतुकही केले. परंतु बुधवारी त्रुटी दूर न झाल्याचे कारण देत कामकाज बंद ठेवण्याचे तडकाफडकी आदेश दिले.रक्तपेढी बंद करण्याची दिली होती धमकीमेडिकल रक्तपेढीच्या काही कर्मचाऱ्यांनी ‘लोकमत’ला नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, एफडीएच्या अधिकाऱ्यांनी जेव्हा तपासणी केली तेव्हा रक्तपेढीच्या अधिकाऱ्याला रक्तपेढी बंद करण्याची धमकी दिली होती. ही धमकी बुधवारी खरी ठरली. सोबतच पत्रकारांना याची माहिती देऊ नका, अशी तंबीही दिली होती.केवळ २०० रक्तपिशव्या शिल्लकमेडिकलच्या रक्तपेढीतून दिवसाकाठी ६० ते ७० वर रक्तपिशव्या रुग्णांना उपलब्ध करून दिल्या जातात. परंतु बुधवारी सायंकाळपासून रक्त घेणे, तपासणे व गोळा करण्याचे कामकाज बंद पडल्याने २९० रक्तपिशव्यांमधून गुरुवारी सायंकाळपर्यंत २०० रक्तपिशव्या उरल्याची माहिती आहे. शनिवारपर्यंत अशीच स्थिती राहिल्यास रुग्णांवर रक्तासाठी भटकंती करण्याची वेळ येऊ शकते, असे वरिष्ठ डॉक्टरांचे म्हणणे आहे.