शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

मेडिकल : सात दिवसात आठ कोटींच्या यंत्र खरेदीला मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2019 00:53 IST

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) गेल्या सात दिवसात यंत्र सामुग्रीसाठी ८ कोटी ३१ लाखांच्या खर्चाला शासनाने मंजुरी दिली आहे.

ठळक मुद्देलवकरच रुग्णसेवेत नवे ४५ यंत्र

लोकमत  न्यूज  नेटवर्क  नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) गेल्या सात दिवसात यंत्र सामुग्रीसाठी ८ कोटी ३१ लाखांच्या खर्चाला शासनाने मंजुरी दिली आहे. या निधीतून ४५ यंत्रांची खरेदी केली जाणार आहे. जिल्हा वार्षिक योजना व जिल्हा खनिज प्रतिष्ठानचा हा निधी आहे.मेडिकलला दरवर्षी जिल्हा नियोजन समिती व वैद्यकीय शिक्षण विभागाकडून यंत्रसामुग्री खरेदीसाठी निधी उपलब्ध करून दिला जातो. या निधीतून ज्या विभागाला यंत्राची गरज आहे त्यांच्या प्रस्तावानुसार यंत्राची खरेदी केली जाते. परंतु गेल्या वर्षी निधी उपलब्ध होऊनही प्रस्तावानुसार फार कमी यंत्र उपलब्ध झाली होती. परंतु यावर्षी एक-एक यंत्र यायला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे, १३ ते २० ऑगस्ट या दरम्यान यंत्र खरेदीसाठी ८ कोटी ३१ लाख रुपयांच्या खर्चाला प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. यात जिल्हा वार्षिक योजनेतून १ कोटी २५ लाखांचा निधी आहे. या निधीतून ‘एअरसील विथ ऑल अ‍ॅक्सेसरीज’, ‘व्हॅलिलॅब एफ टी-१० अ‍ॅनर्जी प्लॅटफॉर्म’ व ‘एन्कॉर इनस्पायर व्हॅकम अ‍ॅसिस्टेड ब्रेस्ट बायोप्सी’ या यंत्राची खरेदी केली जाणार आहे. या वर्षी पहिल्यांदाच जिल्हा खनिज प्रतिष्ठान नागपूरच्यावतीने मोठा निधी मेडिकलला उपलब्ध झाला आहे. यातील ६ कोटी ७२ लाखांच्या निधीला शासनाने मंजुरी दिली आहे. या निधीतून ३१ व्हेंटिलेटर्ससह १६ विविध यंत्रांची खरेदी केली जाणार आहे. यात एक कोटीच्या ‘अल्ट्रासोनिक फायबर व्हिडीओ ब्रान्कोस्कोप विथ अल्ट्रासाऊंड विथ अल्ट्रासोनिक प्रोसेसर’यंत्राचा समावेश् आहे. या सर्व यंत्र खरेदीला प्रशासकीय मंजुरी मिळाली असलीतरी खरेदी प्रक्रियेला वेळ लागणार आहे. परंतु या यंत्रामुळे मेडिकलमधील रुग्णांचा मोठा फायदा होणार आहे.

टॅग्स :Government Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयtechnologyतंत्रज्ञान