लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनामुळे लॉक डाऊन करण्यात आल्यामुळे अनेकांचा रोजगार बुडाला आहे. हजारो कामगार विविध जिल्ह्यांमध्ये अडकून पडले आहेत. या कामगारांना आपापल्या गावी जाण्यासाठी स्थानिक प्रशासनाकडून श्रमिक स्पेशल रेल्वेगाडीची व्यवस्था करण्यात येत आहे. त्यानुसार शुक्रवारी ३ रेल्वेगाड्या नागपूर रेल्वेस्थानकावर दाखल झाल्या. या गाड्यांमधील ३६०० कामगारांच्या भोजनाची व्यवस्था इंडियन रेल्वे कॅटरिंग अॅण्ड टूरिझम कॉर्पोरेशनच्या वतीने करण्यात आली.नागपुरात शुक्रवारी सकाळी ९.१० वाजता ०७०१६ लिंगमपल्ली-वाराणसी श्रमिक स्पेशल रेल्वेगाडी दाखल झाली. या गाडीने १२०० कामगार प्रवास करीत होते. प्रवासात ६ ते ७ तासानंतर या गाडीतील कामगारांना भूक लागली होती. त्यामुळे नागपूर रेल्वेस्थानकावर ‘आयआरसीटीसी’च्या वतीने या कामगारांना व्हेज बिर्याणी, लोणच्याची पुडी आणि पाण्याची बॉटल देण्यात आली. थोड्या वेळाने सकाळी १०.३० वाजता रेल्वेगाडी क्रमांक ०७०१८ लिंगमपल्ली-गोंडा ही गाडी आली. या गाडीतही १२०० कामगार होते. त्यांच्याही भोजनाची व्यवस्था करण्यात आली. त्यानंतर ११.२० वाजता रेल्वेगाडी क्रमांक ०७०१९ घाटकेसर-विदिशा ही श्रमिक स्पेशल रेल्वेगाडी आली. या गाडीतील कामगारांनाही भोजन पुरविण्यात आले. ‘आयआरसीटीसी’चे प्रादेशिक व्यवस्थापक आहत सिद्दिकी, कॅटरींग असिस्टंट लोकेश तिवारी, चीफ सुपरवायझर रंजीत रंजन, पवन भटनागर, छोटेलाल मीना, किसले कुमार यांनी या गाड्यांमध्ये भोजन पुरविण्याची जबाबदारी पार पाडली.
नागपूर रेल्वेस्थानकावर ३६०० कामगारांना पुरविले भोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 00:54 IST
शुक्रवारी ३ रेल्वेगाड्या नागपूर रेल्वेस्थानकावर दाखल झाल्या. या गाड्यांमधील ३६०० कामगारांच्या भोजनाची व्यवस्था इंडियन रेल्वे कॅटरिंग अॅण्ड टूरिझम कॉर्पोरेशनच्या वतीने करण्यात आली.
नागपूर रेल्वेस्थानकावर ३६०० कामगारांना पुरविले भोजन
ठळक मुद्दे ‘आयआरसीटीसी’ने केली व्यवस्था : प्रवासात भुकेल्या कामगारांना आधार