शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

भाजी विक्रीच्या नावाखाली एमडी तस्करी; १.५८ लाखाचा माल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2023 21:57 IST

Nagpur News भाजी विक्रीच्या आड एमडीची तस्करी करणाऱ्या युवकाला नंदनवन पोलिसांनी रंगेहाथ पडकले आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून १.५८ लाख रुपयांची एमडी जप्त केली आहे.

नागपूर : भाजी विक्रीच्या आड एमडीची तस्करी करणाऱ्या युवकाला नंदनवन पोलिसांनी रंगेहाथ पडकले आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून १.५८ लाख रुपयांची एमडी जप्त केली आहे. आरोपीचे नाव मो. नौशाद उर्फ राजा मो. इब्राहीम (२८, रा. बाबा फरीदनगर, खरबी) आहे.राजा आठवडी बाजारात भाजीचा ठेला लावत होता. त्याला एमडीचे व्यसन आहे. भाजी विक्रीतून त्याचे एमडीचे व्यसन पूर्ण होत नव्हते. दरम्यान, त्याची एमडीचे व्यसन असलेल्यांशी ओळख झाली. त्यातूनच राजा एमडीची तस्करी करू लागला. आठवडी बाजारात दुकान लावत असल्याने त्याला ग्राहक सहज मिळत होते. बाजारात ग्राहकांची गर्दी होत असल्याने त्याच्यावर संशयही येत नव्हता. काही महिन्यांपासून तो एमडीची तस्करी करीत होता. नंदनवन पोलिसांना त्याच्यासंदर्भात गुप्त माहिती मिळाली.

सोमवारी हसनबाग येथे आठवडी बाजारात तो एमडीची विक्री करीत होता. पोलिसांनी सापळा रचून त्याला पकडले. त्याची झाडाझडती घेतल्यावर त्याच्याजवळून १५ ग्रॅम ८७ मिलिग्रॅम एमडी मिळाली. त्याची किंमत १.५८ लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी त्याला अटक केली. राजा मोठ्या तस्करांकडून एमडी खरेदी करीत होता. पोलिस मोठ्या तस्करांचा पत्ता लावत आहे. हसनबागमध्ये एमडीच्या विक्रीबरोबर इतर मादक पदार्थ विक्रीचे अड्डे आहेत. हसनबागच्या आठवडी बाजारात गांजा विक्री तसेच सट्टादेखील चालतो. असामाजिक तत्व येथे सक्रिय आहेत. स्थानिक नागरिकांनी नंदनवन पोलिसांकडे तस्करी करणाऱ्यांविरूद्ध कारवाईची मागणी केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी