शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
5
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
6
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
7
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
8
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
9
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
10
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
12
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
13
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
14
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
15
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
16
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
17
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
19
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया

नागपुरातील राजनगरमध्ये सापडला एमडी तस्कर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2019 23:12 IST

एनडीपीएस सेलने रेव्ह पार्टी व युवकांना एमडीचा पुरवठा करणाऱ्या एका युवकाला सदर परिसरातील राजनगर येथे पकडले. कारमध्ये डिलेव्हरी देण्यासाठी तो आला होता. त्याच्याकडून ४.३० लाख रुपयांचा माल जप्त केला.

ठळक मुद्देकारने येत होता डिलेव्हरी द्यायला : मोठे रॅकेट सक्रिय असल्याचे संकेत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एनडीपीएस सेलने रेव्ह पार्टी व युवकांना एमडीचा पुरवठा करणाऱ्या एका युवकाला सदर परिसरातील राजनगर येथे पकडले. कारमध्ये डिलेव्हरी देण्यासाठी तो आला होता. त्याच्याकडून ४.३० लाख रुपयांचा माल जप्त केला. आरोपी फ्रेंड्स कॉलनी गिट्टीखदान येथील ३२ वर्षीय अफजल ऊर्फ अरबाज ऊर्फ जासीम जहीन खान आहे.पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले की, अफजलचे नाव बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. एका आरोपीच्या हत्येच्या प्रकरणात तो संशयाच्या घेऱ्यात आला होता. परंतु पुराव्याअभावी त्याच्यावर कारवाई करण्यात आली नाही. पोलिसांना बºयाच दिवसांपासून तो एमडी तस्करी करीत असल्याची माहिती होती. अरबाज फक्त विश्वासातील लोकांनाच डिलिव्हरी देत होता. त्यामुळे पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी योजना आखली होती.पोलिसांनी डमी ग्राहकाला अरबाजकडे पाठविले. त्याने ग्राहकाला सोमवारी रात्री १२ वाजता राजनगरातील अचरज रिट्रीट अपार्टमेंटजवळ बोलाविले. अरबाज कारने तिथे पोहचला. १० ग्राम एमडीसाठी त्यांचा ३० हजार रुपयांत सौदा झाला. तेव्हाच पोलिसांनी छापा टाकून अरबाजला अटक केली. त्याच्याजवळील एमडी व कार जप्त केली. सूत्रांच्या मते अरबाजची सखोल चौकशी केली असता, एमडी तस्करीच्या मोठ्या नेटवर्कचा खुलासा होऊ शकतो. त्याच्या वडिलांविरुद्धसुद्धा फसवणुकीचे गुन्हे दाखल आहे. अरबाजला ताब्यात घेतल्याची माहिती मिळाल्याबरोबर त्याचे वडील गुन्हे शाखेत पोहचले. परंतु वडिलांना परत पाठविण्यात आले. पोलिसांनी अरबाजविरुद्ध मादक पदार्थाची तस्करी केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. ही कारवाई अप्पर आयुक्त नीलेश भरणे, उपायुक्त गजानन राजमाने, एसीपी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनात निरीक्षक राजेंद्र निकम, सहा. पोलीस निरीक्षक विजय कसोधन, विठोबा काळे, अर्जुनसिंह ठाकूर, हवलदार दत्ता बागुल, तुळशीदास शुक्ला, प्रदीप पवार, सतीश पाटील, शिपाई नितीन मिश्रा, नितीन साळुंखे, नरेश शिंगणे, तसेच रुबिना यांनी केली.एका महिलेवरही संशयपरिसरातील एका अपार्टमेंटमध्ये अरबाजला ओळखणारी महिला राहते. तीसुद्धा बऱ्याच काळापासून मादक पदार्थाच्या तस्करीत व अवैध धंद्यामध्ये लिप्त आहे. पोलीस तिच्या फ्लॅटवर पाळत ठेवून होते. परंतु फ्लॅटला कुलूप असल्यामुळे पोलीस परतले. मिळालेल्या माहितीनुसार या महिलेचे शहरात मोठे नेटवर्क आहे. शहरातील व्यापाऱ्यांची मुले तिच्याशी जुळलेली आहे. या प्रकरणाची चौकशी केली असता, अनेक खुलासे होऊ शकतात, पोलीससुद्धा त्याच दिशेने तपास करीत आहे.

 

टॅग्स :Drugsअमली पदार्थSmugglingतस्करीArrestअटक