शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील कृषी विभागातील बहुतेक बदल्या आता मंत्रीमुक्त, आता बदल्यांचे अधिकार कोणाला?
2
ठाणे: 'पार्टीत चूक झाल्यास अप्पा मुलांना द्यायचा विजेचा शॉक'; खडवली बालआश्रमातून सुटका केलेल्या मुलांनी सांगितली आपबीती
3
टॅरिफने अर्थव्यवस्था कमकुवत, महागाई वाढेल, पण मंदी नाही : जॉर्जीव्हा
4
सोयाबीन खरेदीचा ‘एमपी पॅटर्न’, २४ तासांत हातात पैसे; अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन
5
‘भगवद्गीता’ची हस्तलिखितांचा युनेस्कोच्या ‘जागतिक स्मृती रजिस्टर’मध्ये समावेश
6
नाशिक दर्ग्याचे पाडकाम प्रकरण : महापालिकेच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
7
छत्रपती संभाजीनगर: एम.फिल. धारक प्राध्यापक रडारवर, पात्रता कागदपत्रांची होणार तपासणी
8
छत्रपती संभाजीनगरात डिफेन्स पार्कसाठी  संरक्षणमंत्री अनुकूल, दिल्लीत बैठक घेणार
9
मुंबई: स्वस्त सोन्याच्या मोहाने घात केला; सराफा व्यापाऱ्याला विकली हातात २.३० कोटींची नकली नाणी
10
"छत्रपती शिवरायांच्या सैन्यात मुस्लिम लोक होते"; आमचे आदर्श मुस्लिमविरोधी नसल्याचे राजनाथ सिंहांचे विधान
11
Tim David नं मोडला किंग कोहलीचा विक्रम; अर्धशतकी खेळीसह असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
12
“कधीही कोणत्याही उपराष्ट्रपतींना अशी राजकीय विधाने करताना पाहिले नाही”: कपिल सिब्बल
13
RCB vs PBKS : पावसाच्या बॅटिंगनंतर विराटसह RCB च्या स्टार फलंदाजांची 'घसरगुंडी' अन् पंजाबचा भांगडा!
14
लाडकी बहीण योजना: एप्रिलचा हप्ता कधी मिळेल? ५०० मिळणार की १५००? नियम बदलले का? जाणून घ्या
15
Maiden IPL Fifty For Tim David : एकटा पडला, शेवटपर्यंत नडला अन् पहिली फिफ्टीही ठोकली
16
धक्कादायक; सोलापूरचे न्युरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांची आत्महत्या; डोक्यात झाडली गोळी
17
IPL 2025 :पदार्पणाच्या सामन्यात जे घडलं तेच १८ वर्षांनी पुन्हा विराट कोहलीच्या वाट्याला आलं
18
“अमित शाह भेट वैयक्तिक होती तर तो भार सरकारी तिजोरीवर कशाला, तटकरेंनी...”; कुणी केली टीका?
19
२००० रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या UPI व्यवहारांवर भरावा लागणार जीएसटी? सरकारने केली घोषणा
20
अरविंद केजरीवाल यांच्या लेकीचे फाईव्ह स्टार हॉटेलात थाटात लग्न...! जावई कोण? काय करतो...

माया गँगवर लावला मकोका :  सुमित चिंतलवार सूत्रधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 00:45 IST

माया गँगचा सूत्रधार सुमित चिंतलवार आणि त्याच्या तीन साथीदारांविरुद्ध नंदनवन पोलिसांनी मकोका लावला असून तहसिल पोलिसांनी कुख्यात दानिश अहमदसह तीन गुन्हेगारांविरुद्ध तडीपारीची कारवाई केली आहे.

ठळक मुद्देकुख्यात दानिशसह तिघे तडीपार

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : माया गँगचा सूत्रधार सुमित चिंतलवार आणि त्याच्या तीन साथीदारांविरुद्ध नंदनवन पोलिसांनी मकोका लावला असून तहसिल पोलिसांनी कुख्यात दानिश अहमदसह तीन गुन्हेगारांविरुद्ध तडीपारीची कारवाई केली आहे.सुमितच्या विरुद्ध खुन, खुनाचा प्रयत्न, दंगा, हप्ता वसुलीसह २१ गुन्हे दाखल आहेत. दक्षिण नागपुरात त्याची दहशत आहे. माया गँगचा सूत्रधार असल्यामुळे त्याने पडद्याआड अनेक खून केले आहेत. या गँगमध्ये अजनी परिसरातील अनेक कुख्यात गुन्हेगार आहेत. यात अल्पवयीन आरोपींचाही समावेश आहे. त्यांना पुढे करून सुमितने गुन्हेगारी जगतात आपला दबदबा निर्माण केला आहे. सुमितने १६ डिसेंबर २०१८ रोजी साथीदारांच्या मदतीने नंदनवनमध्ये अर्जुन चिट्टीयारचे अपहरण केले होते. तो या प्रकरणात जमानतीवर सुटला. त्यानंतर तो बराच काळ फरार होता. दरम्यान तो चंद्रपुरात दारूची तस्करी करीत होता. दोन महिन्यापुर्वी गुन्हेशाखेच्या पोलिसांनी त्याला पकडले. तेंव्हापासून तो तुरुंगात आहे. चिंतलवार गँगविरुद्ध मकोकाची कारवाई केल्यामुळे दक्षिण नागपुरातील गुन्हेगारात खळबळ उडाली आहे. सुमितच्या साथीदारांचा शोध घेण्यात येत असल्यामुळे पोलिसांनी त्यांची नावे उघड केलेली नाहीत. सुमितचे संपुर्ण कुटुंबच गुन्हेगारीत आहे. त्यामुळे पोलिसांच्या कारवाईमुळे नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. तहसिल पोलीस ठाण्याच्या परिसरात सक्रिय कुख्यात गुन्हेगार दानिश अहमद मुश्ताक अहमदला दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. दानिशच्या विरुद्ध दंगा, मारहाण, हल्ला, हप्ता वसुलीसह अनेक गुन्हे दाखल आहेत. तो जाफरनगरात राहतो. तो तहसिल पोलीस ठाण्यांतर्गत गुन्हेगारीच्या घटना घडवितो. त्याला अटक करून भंडारा येथे नातेवाईकांच्या घरी सोडण्यात आले आहे. यशोधरानगर ठाण्याच्या परिसरातील गुन्हेगार अब्दुल बाशीद ऊर्फ बाशीद पटेलला तीन महिने तसेच अब्दुल अलीम अब्दुल अजीजला सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले आहे. बाशीदला खापरखेडा आणि अलीमला खापा येथे नातेवाईकांकडे सोडण्यात आले आहे.ठाण्यातून सोडले आरोपीलादानिशच्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या भावाने याच आठवड्यात मोमिनपुरा चौकात हंगामा करताना रोखल्यामुळे पोलिसांशी वाद घातला होता. त्याला तहसिल ठाण्यात आणल्यानंतर ठाण्यातच त्याला जमानत देण्यात आली. त्याच्या विरुद्ध कठोर कारवाई करता आली असती. तो काही दिवसांपूर्वीच एमपीडीए अंतर्गत एका प्रकरणातून सुटला होता. या प्रकरणाची माहिती झाल्यानंतर झोन तीनचे उपायुक्त राहुल माकणीकर यांनी पोलिसांना फटकारले होते. त्यानंतर दानिशचा भाऊ भूमिगत झाला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMCOCA ACTमकोका कायदा