शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील कुख्यात संतोष आंबेकरविरुद्ध मकोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 22:53 IST

नागपूरच्या गुन्हेगारी जगताचा म्होरक्या, कुख्यात गुंड संतोष आंबेकर आणि त्याच्या टोळीतील पाच गुंडांविरुद्ध पोलिसांनी मकोका लावला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूरच्या गुन्हेगारी जगताचा म्होरक्या, कुख्यात गुंड संतोष आंबेकर आणि त्याच्या टोळीतील पाच गुंडांविरुद्ध पोलिसांनी मकोका लावला आहे.संतोष आंबेकर सध्या मकोकाच्या गुन्ह्यातच कारागृहात बंदिस्त आहे. त्याच्याविरुद्ध वर्षभरात गुन्हे शाखेने कधी नव्हे एवढी कठोर कारवाई केली.त्याच्या ताब्यातून आलिशान वाहने, मोठ्या प्रमाणावर रोकड आणि मालमत्तेची कागदपत्रे ताब्यात घेतली. त्याच्या इमारतीवरही बुलडोझर चालविला. ३० वर्षात पहिल्यांदाच संतोषविरुद्ध गुन्ह्यांची मालिका दाखल झाली. संतोष आणि त्याच्या टोळीतील अनेक गुंडांवर गुन्हे दाखल करून पोलिसांनी त्यांना कारागृहात डांबले. २२ नोव्हेंबर २०१९ ला संतोषविरुद्ध नवीन कामठी पोलीस ठाण्यातही फसवणूक तसेच विविध कलमांनुसार गुन्हा दाखल झाला होता. कुख्यात संतोष, त्याचा भाचा नीलेश ज्ञानेश्वर केदार, प्रवीण नावाचा इसम आणि अन्य तीन साथीदार अशा सहा लोकांनी धान्य व्यापारी विकास रामदास जैन यांची कामठीतील कोट्यवधी रुपयांची जमीन बनावट कागदपत्रांच्या आधारे हडपली होती. जैन यांच्या नावाने निबंधक कार्यालयात आरोपी संतोष याने भलताच इसम उभा केला होता. हा गुन्हा उघड झाल्यानंतर संतोषकडून जमिनीची कागदपत्रे पोलिसांनी जप्त केली होती. त्याची ही कृती लक्षात घेता त्याच्याविरुद्ध पोलिस आयुक्त अमितेशकुमार, गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त सुनील फुलारी, उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस आयुक्त सुधीर नंदनवार यांनी तपास करून मंगळवारी पोलिसांनी आंबेकर, केदार, प्रवीण आणि अन्य तीन साथीदारांविरुद्ध मकोका लावला.

वर्षभरात दुसऱ्यांदा मकोकाएकाच गुंडाच्या टोळीविरुद्ध वर्षभरात दुसऱ्यांदा मकोकानुसार कारवाई होण्याची अलीकडच्या काळातील ही पहिलीच घटना आहे. विशेष म्हणजे गेल्या दहा वर्षात संतोष आणि साथीदारांविरुद्ध पाच वेळा मकोका लागला होता. मात्र कायद्यातील पळवाटा शोधून तो या पाचही प्रकरणात बाहेर पडला.

टॅग्स :MCOCA ACTमकोका कायदाnagpurनागपूर