शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
2
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
6
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
7
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
8
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
9
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
10
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
11
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
12
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
13
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
14
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
15
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
16
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
17
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
18
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
19
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
20
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'

‘१००’ नंबरीसमोर एमबीबीएस विद्यार्थ्यांची हुल्लडबाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 11:34 PM

‘सायलन्स झोन’मध्ये मोडणाऱ्या मेडिकलच्या परिसरातच एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांनी फटाके फोडले, आरडाओरड करीत परिसर दणाणून सोडला. विद्यार्थ्यांच्या हुल्लडबाजीवर तेथे बाजूलाच गाडीत बसून असलेले पोलीस मूकदर्शक बनले. त्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देताच त्यांचा राग अनावर झाला. त्यांनी १०० नंबर डायल करण्याचा अजब सल्ला दिला. या कृत्याचे मोबाईलमध्ये चित्रीकरणाचा प्रयत्न करताच पोलीस उपनिरीक्षक प्रदीप गुजर यांनी मोबाईल हिसकण्याचा प्रयत्न केला. चीड आणणाऱ्या या घटनेवरून पुन्हा एकदा पोलिसांच्या जबाबदारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले.

ठळक मुद्देमेडिकलच्या सायलेन्स झोनमध्ये फोडले फटाके, आरडाओरडही केली: पोलीस बनले मूकदर्शक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘सायलन्स झोन’मध्ये मोडणाऱ्या मेडिकलच्या परिसरातच एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांनी फटाके फोडले, आरडाओरड करीत परिसर दणाणून सोडला. विद्यार्थ्यांच्या हुल्लडबाजीवर तेथे बाजूलाच गाडीत बसून असलेले पोलीस मूकदर्शक बनले. त्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देताच त्यांचा राग अनावर झाला. त्यांनी १०० नंबर डायल करण्याचा अजब सल्ला दिला. या कृत्याचे मोबाईलमध्ये चित्रीकरणाचा प्रयत्न करताच पोलीस उपनिरीक्षक प्रदीप गुजर यांनी मोबाईल हिसकण्याचा प्रयत्न केला. चीड आणणाऱ्या या घटनेवरून पुन्हा एकदा पोलिसांच्या जबाबदारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) सोमवारी एमबीबीएस प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाचा शेवटचा पेपर होता. दुपारी १ वाजताच्या सुमारास पेपर सुटताच विद्यार्थ्यांनी अधिष्ठाता कार्यालयासमोर आरडाओरड करणे सुरू केले. फटाक्यांची लड फोडली. तेथून ५० ते १०० विद्यार्थी दुचाकीवर स्वार होऊन ‘ई-लायब्ररी’समोर आले. नारेबाजी, हुल्लडबाजी करीत सुतळी बॉम्ब फोडणे सुरू केले. मेडिकलच्या परिसरात समाजविघातकांवर वचक बसविण्यासासाठी गस्त घालणारे ‘एमएच ३१ डीझेड ०५१९’ पोलीस वाहन जवळच उभे होते. बºयाच वेळापर्यंत पोलिसांकडून कारवाई होत नसल्याचे पाहत तिथे उपस्थित ‘लोकमत’प्रतिनिधींनी त्यांना हे ‘सायलेन्स झोन’आहे, विद्यार्थ्यांना थांबवा, अशी विनंती केली. यावर पोलिसांनी दखल घेणे टाळून ‘१००’ क्रमांकावर फोन करण्याचा सल्ला दिला. त्यांच्याकडून तक्रार आल्यावरच आम्ही कारवाई करू, असे उत्तर देऊन हात वर केले. ही घडामोड मोबाईलमध्ये टिपून घेत असताना वाहनामधून पोलीस उपनिरीक्षक प्रदीप गुजर धावून आले. त्यांनी मोबाईल हिसकण्याचा प्रयत्न केला. ‘लोकमत’ प्रतिनिधी असल्याची ओळख दिल्यावर वाद घातला. विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यास तयार नव्हते. प्रतिनिधी निघून जात असताना पाहून पोलीस व्हॅन विद्यार्थ्यांच्या दिशेने निघाली; मात्र त्यानंतरही विद्यार्थ्यांचा उन्माद सुरूच होता.पोलीस गुन्हा घडण्याची वाट पाहणार का? 
पोलिसांसमोर गुन्हा घडत असताना, पोलिसच जर १०० क्रमांकावर तक्रार करा, नंतर आम्ही कारवाई करतो, अशी भूमिका घेत असतील तर गुन्हेगारांवर वचक कसा बसणार, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. विद्यार्थ्यांच्या हुल्लडबाजीवरून अनेक वरिष्ठ डॉक्टर, लायब्ररीमध्ये अभ्यास करणारे विद्यार्थी व रुग्णांच्या नातेवाईकांनी नाराजी व्यक्त केली. विशेष म्हणजे पोलिसांसमोर हा प्रकार होऊनही दखल न घेणाऱ्या पोलिसांवरही पोलीस आयुक्तांनी कारवाई करावी, अशी मागणीही केली.

 

टॅग्स :Government Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयCrackersफटाके