शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

मेयोत पार्किंगचा ताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 01:15 IST

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या पार्किंगमध्ये गाडी उभी ठेवली नसतानाही पैसे मोजावे लागत आहेत. स्टॅण्ड संचालकांच्या या जाचाचा रुग्णांच्या नातेवाईकांना मात्र फटका बसतो आहे.

ठळक मुद्देस्टॅण्डवर गाडी ठेवली नसतानाही होते वसुली : रुग्णांचे नातेवाईक त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या पार्किंगमध्ये गाडी उभी ठेवली नसतानाही पैसे मोजावे लागत आहेत. स्टॅण्ड संचालकांच्या या जाचाचा रुग्णांच्या नातेवाईकांना मात्र फटका बसतो आहे.याशिवाय जे स्टॅण्डवर गाडी नसताना पैसे देण्यास विरोध दर्शवितात त्यांना मेयोत नाहक मनस्ताप सहन करावा लागतो आहे. यासंदर्भात मेयो प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या जात असतानाही प्रशासनाचे मात्र यावर मौन आहे.काही वर्षांपूर्वी मेयोत वाहनांच्या पार्किंगसाठी स्टॅण्ड होते. त्याहीवेळी रुग्णांच्या नातेवाईकांना अशा जाचाला बळी पडावे लागले होते. मात्र याला मोठ्या प्रमाणावर विरोध झाल्याने ते बंद करण्यात आले होते. आता यावेळी त्याच स्टॅण्ड संचालकांना मेयो प्रशासनाने कंत्राट दिले आहे. मात्र यावेळीही गतवेळसारखीच स्थिती येथे उद्भवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.मेयो रुग्णालयाच्या नवीन ओपीडीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळील जागा पार्किंगसाठी तात्पुरती निश्चित करण्यात आली आहे. मेयो प्रशासनानुसार ही जागाही नि:शुल्क पार्किंगसाठी आहे. मात्र येथे नो पार्किंगचा फलक लावण्यात आला आहे. या ठिकाणी वाहनांचे पार्किंग करण्यासाठी स्टॅण्ड संचालक नागरिकांना विरोध करतात.रस्त्यावर वाहन उभे राहिल्याने वाहतुकीची कोंडी होते. ही समस्या दूर व्हावी यासाठी स्कूटर स्टॅण्डची निविदा काढण्यात आली. स्टॅण्ड संचालकांना पार्किंग स्टॅण्डसाठी चार जागा देण्यात आल्या आहेत. या जागा सोडल्यास तर मेयोत इतर कुठेही पार्किंग शुल्क आकारता येत नाही. संबंधित स्टॅण्ड संचालकाच्या असभ्य वागणुकीबाबत तक्रारी आहेत. यावर निश्चितच तोडगा काढला जाईल.- डॉ.सागर पांडे,जनसंपर्क अधिकारी, मेयोमेयोत विकास कामे झाल्याने येथे पार्किंगची व्यवस्थाही नि:शुल्क असणे आवश्यकच आहे. यासाठी आवश्यक प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. खासगी स्टॅण्ड संचालकांमुळे होणाºया त्रासाबाबत प्रशासनाशी लवकरच चर्चा केली जाईल.- आ.विकास कुंभारे