शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

महापौरांना आर्थिक व प्रशासकीय अधिकार मिळावेत; परिषदेच्या अध्यक्षांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 13:06 IST

राज्यातील महापौरांना आर्थिक व प्रशासकीय अधिकार असावेत, सत्तेची सर्व सूत्रे आयुक्तांच्या हाती नसावीत, अधिकारांचे विकेंद्रीकरण केले जावे अशा मागण्या नागपुरात शनिवारी सुरू झालेल्या १८ व्या महापौर परिषदेत मुंबईचे महापौर व परिषदेचे अध्यक्ष विश्वनाथ महाडेश्वर यांनी केली.

ठळक मुद्देनागपुरात १८ व्या महाराष्ट्र महापौर परिषदेचे उदघाटन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: राज्यातील महापौरांना आर्थिक व प्रशासकीय अधिकार असावेत, सत्तेची सर्व सूत्रे आयुक्तांच्या हाती नसावीत, अधिकारांचे विकेंद्रीकरण केले जावे अशा मागण्या नागपुरात शनिवारी सुरू झालेल्या १८ व्या महापौर परिषदेत मुंबईचे महापौर व परिषदेचे अध्यक्ष विश्वनाथ महाडेश्वर यांनी केली. यासंदर्भातील निवेदन त्यांनी मुख्यमंत्र् यांना सोपविले आहे.या परिषदेत नागपूरच्या महापौर नंदा जिचकार यांनी महानगरपालिकांना आर्थिक सहकार्य करण्याची मागणी केली. या परिषदेला सेनेचे चार महापौर अनुपस्थित होते.याप्रसंगी बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी, मनपामध्ये ९० टक्के नगरसेवक खर्च कसा करायचा याचाच विचार करतात. मात्र मनपाचे उत्पन्न कसे वाढेल याचा विचार फक्त १० टक्के नगरसेवक करीत असल्याचे प्रतिपादन केले. परिणामी अनेक महानगरपालिका कटोरा घेऊन सरकारकडे जातात. उत्पन्न कसे वाढेल यावर अधिक विचार व्हायला हवा असे ते पुढे म्हणाले.मुंबईत नाटकांसाठी ५ हजार रुपयात सभागृह उपलब्ध झाले पाहिजे. मराठी अस्मिता हा तर शिवसेनेचा विषय आहे. कमी दरात नाट्यगृह मिळाले तर नाटक संस्कृती वाढेल असा चिमटा यावेळी गडकरी यांनी काढला.महापौरांचे अधिकार वाढविण्याबाबत गंभीरपणे विचार करू असे आश्वासन देत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महानगरपालिकांनी विकास आराखड्याला महत्त्व द्यावे. आर्थिक उत्पन्नाच्या स्रोतांत वाढ करण्याबाबत विचार व्हावा, लोकप्रतिनिधी व प्रशासनाने समन्वयाने काम करावे असे मत व्यक्त केले. 

टॅग्स :Nanda Jichakarनंदा जिचकार