शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

मेयो : एमआरआय मिळाले मनुष्यबळ कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 23:27 IST

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे (मेयो) बहुप्रतिक्षित ‘एमआरआय’ यंत्र अखेर गेल्या महिन्यात दाखल झाले. या यंत्रासोबतच लवकरच ‘सिटीस्कॅन’ व ‘डी.एस.ए.’ यंत्र उपलब्ध होणार आहे. या यंत्रावरील तपासणीचा अहवाल तयार करण्यापासून ते यंत्र चालविणाऱ्या तंत्रज्ञापर्यंतचा ३० पदांचा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण विभागाकडे पाठविण्यात आला आहे. परंतु अद्यापही याला मंजुरी मिळाली नाही. मेयो प्रशासनाचा ऑगस्ट महिन्यापर्यंत हे यंत्र रुग्णसेवेत सुरू करण्याचा प्रयत्न आहे. यामुळे ‘एमआरआय’ मिळाले मनुष्यबळ कधी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

ठळक मुद्दे३० जागांचा पाठविला प्रस्ताव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे (मेयो) बहुप्रतिक्षित ‘एमआरआय’ यंत्र अखेर गेल्या महिन्यात दाखल झाले. या यंत्रासोबतच लवकरच ‘सिटीस्कॅन’ व ‘डी.एस.ए.’ यंत्र उपलब्ध होणार आहे. या यंत्रावरील तपासणीचा अहवाल तयार करण्यापासून ते यंत्र चालविणाऱ्या तंत्रज्ञापर्यंतचा ३० पदांचा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण विभागाकडे पाठविण्यात आला आहे. परंतु अद्यापही याला मंजुरी मिळाली नाही. मेयो प्रशासनाचा ऑगस्ट महिन्यापर्यंत हे यंत्र रुग्णसेवेत सुरू करण्याचा प्रयत्न आहे. यामुळे ‘एमआरआय’ मिळाले मनुष्यबळ कधी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.गेल्या आठ वर्षांपासून ‘एमआरआय’साठी प्रयत्न सुरू होते. हिवाळी अधिवेशनात या यंत्राला घेऊन चर्चाही झाली. ‘एमआरआय युनिट’ नसल्याच्या कारणाने ‘मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया’ने (एमसीआय) मेयोतील ‘डिप्लोमा इन रेडिओ डायग्नोसिस’ची मान्यता काढून घेतली. ‘सिटीस्कॅन’ हे यंत्र कालबाह्य झाल्याने व जानेवारी २०१९ मध्ये बंद पडताच रुग्णालय प्रशासनाने दुरुस्तीच्या भानगडीत न पडता यंत्रच भंगारात काढले. श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डीतर्फे मेयो रुग्णालयाला विविध यंत्र खरेदीसाठी निधी मिळताच प्रक्रियेला सुरुवात झाली. जर्मनी येथील सिमेन्स कंपनीचे ‘एमआरआय’ यंत्र २६ जून रोजी मेयोत दाखल झाले. ‘१२८ स्लाईस सिटी स्कॅन’ व ‘डी.एस.ए.’ या यंत्राची खरेदी प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. ऑगस्ट महिन्यापर्यंत ही सर्वच यंत्रे रुग्णसेवेत सुरू करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. यंत्र उपलब्ध होत असताना मनुष्यबळा विषयी कुणी निर्णय घेत नसल्याने मेयो प्रशासन अडचणीत आल्याचे चित्र आहे.सूत्रानूसार, ही तिन्ही यंत्रे चालविण्यासाठी रेडिओलॉजी विभागाला एक सहयोगी प्राध्यापक, दोन सहायक प्राध्यापक, आठ तंत्रज्ञ, एक इन्चार्ज सिस्टर, पाच सिस्टर, आठ अटेन्डंट व पाच सफाई कर्मचाऱ्यांचा प्रस्ताव पाच महिन्यापूर्वी वैद्यकीय शिक्षण विभागाकडे पाठविण्यात आला होता. परंतु मंजुरीच मिळाली नाही. मे महिन्यात पुन्हा नव्याने प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. ऑगस्ट महिन्यापर्यंत मनुष्यबळाची गरज आहे. अन्यथा यंत्र असताना मनुष्यबळ नसल्याने रुग्णालय प्रशासन अडचणीत येण्याची शक्यता आहे.

टॅग्स :indira gandhi medical college, Nagpurइंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो)Employeeकर्मचारी