शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

MARD Doctor Strike : मेयो, मेडिकलचे निवासी डॉक्टर आजपासून संपावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2021 10:50 IST

मार्ड संघटनेच्या डॉक्टरांनी राज्यभरात १ ऑक्टोबरपासून बेमुदत संप पुकारला आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सर्व निवासी डॉक्टरांचा समावेश आहे.

नागपूर : कोविड काळातील शैक्षणिक फी माफीचे आश्वासन पूर्ण न झाल्याने सेंट्रल मार्डने संपाचे हत्यार उपसले आहे. १ ऑक्टोबरपासून मेयो, मेडिकलचे निवासी डॉक्टरसंपावर जात आहेत.

रुग्णसेवा प्रभावित होऊ नये म्हणून दोन्ही रुग्णालयांमध्ये सहायक प्राध्यापकांच्या वॉर्डात ड्युटी लावण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, अस्थायी सहायक प्राध्यापकही आपल्या मागण्यांना घेऊन ४ ऑक्टोबरपासून संपावर जात आहेत. यादरम्यान तोडगा न निघाल्यास शासकीय रुग्णालय अडचणीत येण्याची शक्यता आहे.

कोरोना काळातील फी माफी, कोविड प्रोत्साहन भत्ता, हॉस्टेल समस्या, पालिकेतील निवासी डॉक्टरांचा टीडीएस अशा विविध मुद्द्यांवर फक्त आश्वासनं मिळाली पण मागण्या पूर्ण झाल्या नाहीत. त्यामुळे डॉक्टरांनी संप पुकारला आहे. या संपामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील सर्व निवासी डॉक्टरांचा समावेश आहे. या संपामुळे रुग्णव्यवस्था कोलमडण्याची शक्यता आहे. हा संप होऊ नये म्हणून प्रशासन आणि डॉक्टरांची २-३ तास चर्चा झाली. मात्र, प्रशासनाकडून डॉक्टरांच्या मनधरणीचे प्रयत्नही निष्फळ ठरले. दरम्यान आपत्कालीन आणि अतिदक्षता विभागातील सेवा सुरू राहतील, संघटनेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. 

दरम्यान, सध्या राज्यातील कोरोनाचे रुग्ण कमी झाले असले तरी कोरोना संकट कायम आहे. त्यात इतर आजारांचे रुग्ण, शस्त्रक्रिया यामुळे रुग्णालयावरील ताण वाढत आहे. अशातच निवासी डॉक्टरांनी संप पुकारल्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे.

टॅग्स :Healthआरोग्यdoctorडॉक्टरhospitalहॉस्पिटलStrikeसंप