लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जनता कर्फ्यूचा परिणाम मेयो, मेडिकलसह खासगी हॉस्पिटलमधील बाह्यरुग्ण विभागातील (ओपीडी) रुग्णसंख्येवर झाला. मेयो, मेडिकलमध्ये इतरवेळी एक ते दीड हजार रुग्णसंख्या राहत असताना शनिवारी ही संख्या ५००च्या आत होती. तर मोठ्या खासगी हॉस्पिटलमधील रोजची ओपीडी २०० ते ३०० वरून ५० ते १०० वर आली. जनता कर्फ्यूच्या आवाहनाला नागपूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. याचा प्रभाव रुग्णसंख्येवरही दिसून आला. विशेषत: मेयो, मेडिकलच्या ओपीडीमध्ये सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत नेहमीच असणारी रुग्णांची गर्दी आज नव्हती. मेडिकलमध्ये आज ४८२ रुग्णांची नोंद झाली. यातील सर्वाधिक रुग्ण, १६७ रुग्ण मेडिसीन विभागातील होते. त्यानंतर जनरल सर्जरीत ५४, त्वचा रोग विभागात ४५, स्त्री रोग व प्रसूती विभागात ३७, नेत्ररोग विभागात ३२, ईएनटी विभागात २९, अस्थिव्यंगोपचार विभागात २८ यासह इतरही विभागात १५च्या खाली रुग्णांची उपस्थिती होती. असेच काहीसे चित्र मेयोतील होते. येथील ओपीडीत २६६ रुग्णांनी उपचार घेतला. खासगी हॉस्पिटलमध्ये दुपारी ३ वाजेपर्यंत फारशी गर्दी नव्हती. गंभीर रुग्णच केवळ उपचारासाठी आले, असे येथील डॉक्टरांचे म्हणणे होते.
मेयो, मेडिकलची ओपीडी अर्ध्यावर आली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 20:50 IST
जनता कर्फ्यूचा परिणाम मेयो, मेडिकलसह खासगी हॉस्पिटलमधील बाह्यरुग्ण विभागातील (ओपीडी) रुग्णसंख्येवर झाला. मेयो, मेडिकलमध्ये इतरवेळी एक ते दीड हजार रुग्णसंख्या राहत असताना शनिवारी ही संख्या ५००च्या आत होती.
मेयो, मेडिकलची ओपीडी अर्ध्यावर आली
ठळक मुद्देरुग्णसंख्येवरही परिणाम : खासगीमध्येही रुग्णसंख्या रोडावली