शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

मेयो, मेडिकलच्या डॉक्टरांचा संप मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2019 00:37 IST

राज्यातील पूरस्थिती, त्यामुळे बळावणारे साथीचे आजार व विद्यावेतन वाढीचा निर्णय मंत्रिमंडळाकडे पाठविण्यात आल्याने निवासी डॉक्टरांची संघटना ‘मार्ड’ने रुग्णहित विचारात घेऊन गुरुवारी बेमुदत संप मागे घेतला.

ठळक मुद्देअन्यथा पुन्हा संप : विद्यावेतन वाढीसाठी ३१ तारखेपर्यंतची मुदत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यातील पूरस्थिती, त्यामुळे बळावणारे साथीचे आजार व विद्यावेतन वाढीचा निर्णय मंत्रिमंडळाकडे पाठविण्यात आल्याने निवासी डॉक्टरांची संघटना ‘मार्ड’ने रुग्णहित विचारात घेऊन गुरुवारी बेमुदत संप मागे घेतला. परंतु ३१ ऑगस्टपर्यंत विद्यावेतन वाढीसह इतरही मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशाराही दिला. संप मिटल्याने मेयो, मेडिकल रुग्णालय प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास टाकला.‘नॅशनल मेडिकल कमिशन’ (एनएमसी) विधेयकाला विरोध, उशिरा मिळणारे विद्यावेतन, विद्यावेतनात पाच हजाराने वाढ, क्षयरोग झालेल्या डॉक्टरांना सुटी व प्रसुती रजा देण्याची मागणी लावून धरत बुधवारी राज्यातील सर्व निवासी डॉक्टर बेमुदत संपावर गेले होते. संपाचा फटका सामान्य रुग्णांना बसला. मेयो, मेडिकलच्या बाह्यरुग्ण विभागात वरिष्ठ डॉक्टर असलेतरी वॉर्डातील रुग्ण डॉक्टरांच्या प्रतीक्षेत होते. काही नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या. केवळ तातडीच्या शस्त्रक्रिया झाल्या. नियमबाह्य हा संप असल्याने शासनस्तरावर ‘मार्ड’वर ‘मेस्मा’ लावण्यात आला. मेयो, मेडिकलच्या ‘मार्ड’ पदाधिकाऱ्यांना या संदर्भात नोटीसही बजावण्यात आल्या.विशेष म्हणजे, संपाच्या एक दिवसापूर्वी मेडिकलमधील निवासी डॉक्टरांचे तीन महिन्यांचे प्रलंबित विद्यावेतन तिजोरीत जमा झाले. बुधवारी डॉक्टरांच्या मागण्यांना घेऊन सेंट्रल मार्डसोबत वैद्यकीय शिक्षण संचालकांची बैठक झाली. यात पाच हजार रुपयांनी विद्यावेतन वाढीचा प्रस्ताव मंत्रिमंडळात पाठविण्यात आल्याचे त्यांना सांगण्यात आले. शिवाय, क्षयरोगबाधित डॉक्टरांना पगारी सुटी व महिला डॉक्टरांना प्रसुती रजा मंजुरीसाठी वैद्यकीय शिक्षण विभाग सकारात्मक असल्याचे स्पष्ट करण्यात आले. यामुळे तसेच राज्यभरातील पूरस्थिती व त्यामुळे वाढणारे साथीचे आजार लक्षात घेऊन ‘मार्ड’ने संप मागे घेण्याचा निर्णय घेतला. सोबतच ३१ ऑगस्टपर्यंत वाढीव विद्यावेतन व इतरही मागण्या पूर्ण न झाल्यास पुन्हा संप पुकारण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला. संप मागे घेताच मेयो, मेडिकलमधील निवासी डॉक्टर गुरुवारी सकाळी ८ वाजताच आपापल्या ड्युटीवर रुजू झाले. यामुळे मेयो, मेडिकलचा कारभार सुरळीत सुरू झाला.

 

टॅग्स :doctorडॉक्टरStrikeसंप