शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

अवयवदानात मेयो इस्पितळाचीही पडणार भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 22:40 IST

अवयव दात्यांच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला (मेयो) ‘नॉन ट्रान्सप्लांट आॅर्गन रिट्रायेवल सेंटर’ (एनटीओआरसी) म्हणजे मेंदूमृत दात्याकडून अवयव काढण्याच्या प्रक्रियेला आरोग्य विभागाने अखेर बुधवारी मंजुरी दिली आहे. या सेंटरसाठी रुग्णालयाच्या न्यायवैद्यकशास्त्र विभागाने घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक होत आहे.

ठळक मुद्देआॅर्गन रिट्रायव्हल सेंटरला मिळाली मंजुरी : न्यायवैद्यकशास्त्र विभागाचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अवयव दात्यांच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला (मेयो) ‘नॉन ट्रान्सप्लांट आॅर्गन रिट्रायेवल सेंटर’ (एनटीओआरसी) म्हणजे मेंदूमृत दात्याकडून अवयव काढण्याच्या प्रक्रियेला आरोग्य विभागाने अखेर बुधवारी मंजुरी दिली आहे. या सेंटरसाठी रुग्णालयाच्या न्यायवैद्यकशास्त्र विभागाने घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक होत आहे.आज भारतात हजारो लोक अवयव दानासाठी दात्यांच्या प्रतीक्षेत आयुष्याचे अखेरचे क्षण मोजत आहेत. देशभरात सुमारे पाच लाख रुग्ण मूत्रपिंड, ५० हजार रुग्ण यकृत आणि दोन हजाराहून अधिक रुग्ण विविध अवयवांच्या प्रतीक्षेत आहेत. यामुळे शासनाकडून अवयवदान चळवळीची व्यापक जनजागृती व चोख व्यवस्थापन होणे महत्त्वाचे झाले आहे. अवयवदानाचे महत्त्व ओळखत मेयोच्या न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. मकरंद व्यवहारे यांनी पुढाकार घेत ‘एनटीओआरसी’चा प्रस्ताव सार्वजनिक आरोग्य विभागाकडे पाठविला होता. या प्रस्तावाला घेऊन आरोग्य विभागाच्या चमूने गेल्याच आठवड्यात रुग्णालयाची पाहणी करून १४ मार्च रोजी मंजुरी दिली. काय आहे ‘एनटीओआरसी’अपघातात डोक्याला मार लागल्याने, मेंदूत रक्तस्राव झाल्याने किंवा मेंदूला कायमस्वरूपी इजा झाल्याने त्या व्यक्तीचा मेंदू मृत (ब्रेन डेड) होऊ शकतो. अशावेळी कृत्रिम श्वासोच्छवास प्रणालीवर (व्हेंटिलेटर) त्या व्यक्तीला ठेवून इतर अवयवांचे कार्य सुरू ठेवले जाते. एखादा रुग्ण ‘ब्रेन डेड’ घोषित झाल्यानंतर, त्याचे अवयव इतर रुग्णांमध्ये प्रत्यारोपीत करण्यासाठी अवयव काढण्याच्या मंजुरीप्राप्त विभागाला ‘नॉन ट्रान्सप्लांट आॅर्गन रिट्रायेवल सेंटर’ म्हटले जाते.रस्ता अपघातात वर्षाला ५०० वर ब्रेनडेड रुग्णडॉ. व्यवहारे म्हणाले, मेयोमध्ये वर्षाला सुमारे १८०० शवविच्छेदन होतात. यात रस्ता अपघातात गंभीर जखमी झालेले ९०० रुग्ण असतात. यातील साधारण ५०० वर रुग्ण ‘ब्रेन डेड’ असतात. ‘ब्रेन डेड’ घोषित करण्यासाठी तज्ज्ञाची समिती असते. त्यांच्या मंजुरीनंतर व रुग्णाच्या नातेवाईकांनी अवयवदानाला परवानगी दिल्यावरच अवयव काढण्याची प्रक्रिया सुरू होते.एक मेंदूमृत व्यक्ती १० रुग्णांंना जीवनदान देऊ शकतेमेंदूमृत दात्याला हृदय, हृदयाच्या झडपा, फुफ्फुस, मूत्रपिंड, त्वचा, डोळे, यकृत, स्वादूपिंड, आतडी, कानाचे ड्रम आदी अवयव दान करता येतात. यामुळे एक मेंदूमृत व्यक्ती साधारण १० रुग्णांना जीवनदान देऊ शकतो. यामुळे मेयोतील ‘एनटीओआरसी’चे महत्त्व वाढणार आहे.-डॉ. मकरंद व्यवहारेविभाग प्रमुख, न्यायवैद्यकशास्त्र विभाग

टॅग्स :nagpurनागपूरOrgan donationअवयव दान