शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना विषाणूच्या निदानाची जबाबदारी मेयोकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 21:15 IST

कोरोना विषाणूच्या संशयित रुग्णाच्या घशातील द्रवाचे व रक्ताचे नमुने तपासणीसाठी राज्यात सहा केंद्र उघडण्यात आले आहे. यात नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महविद्यालय व रुग्णालयाचा (मेयो) समावेश करण्यात आला आहे.

ठळक मुद्देरसायन प्राप्त झाल्यास नागपुरातच तपासणी

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : कोरोना विषाणूच्या संशयित रुग्णाच्या घशातील द्रवाचे व रक्ताचे नमुने तपासणीसाठी राज्यात सहा केंद्र उघडण्यात आले आहे. यात नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महविद्यालय व रुग्णालयाचा (मेयो) समावेश करण्यात आला आहे. रुग्णालयाच्या मायक्रोबायलॉजी विभागाकडे याची जबाबदारी देण्यात आली असून तूर्तास तरी एकही नमुना आला नसल्याची माहिती आहे.कोरोना विषाणूची दहशत आता भारतातही पसरली आहे. केरळमध्ये या विषाणूचा पहिल्या रुग्णांची नोंद झाल्याने सर्वच शासकीय रुग्णालयांना ‘अलर्ट’ करण्यात आले आहे. नागपुरातील ३५ वर्षीय व्यावसायिक चीनमध्ये जाऊन आल्यानंतर त्याला सर्दी आणि खोकल्याचा त्रास वाढल्याने संशयित रुग्ण म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. त्याला मेडिकलच्या वॉर्ड क्र. २५ दाखल केले असून उपचार सुरू आहेत. दिवसेंदिवस संशयित रुग्णाची वाढती संख्या पाहता आजाराच्या निदानासाठी राज्यात सहा नोडल सेंटर तयार करण्यात आले आहे. यात मेयोचाही समावेश आहे. विशेष म्हणजे, विदर्भासह आजूबाजूच्या राज्यातून येणाऱ्या संशयित स्वाईन फ्लू रुग्णांच्या नमुनेही केवळ मेयोच्या मायक्रोबायलॉजी विभागातच तपासले जातात. सध्यातरी संशयित कोरोना विषाणू रुग्णाचा एकही नमुना आला नसल्याची माहिती विभागाचे डॉ. राऊत यांनी दिली.रसायन मिळाल्यास कोरोना विषाणूची तपासणीमेयोचे वैद्यकीय उपअधीक्षक डॉ. सागर पांडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले, या आजाराच्या निदानासाठी नोडल सेंटर म्हणून मेयोचा समावेश करण्यात आला आहे. येथील मायक्रोबायलॉजी विभागाकडे ‘पॉलिमर्स चेन रिअ‍ॅक्शन’ (पीसीआर) यंत्र उपलब्ध आहे. परंतु कोरोना विषाणूच्या तपासणी लागणारे रसायन सध्यातरी उपलब्ध नाही. पुढील दोन-तीन दिवसात पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेतून हे रसायन उपलब्ध झाल्यास येथेच तपासणी होऊन आजाराचे निदान केले जाईल. तोपर्यंत आलेले नमुने पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात येतील.त्या संशयित रुग्णाची प्रकृती स्थिरमेडिकलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांनी सांगितले, कोरोना विषाणूच्या रुग्णांच्या उपचारासाठी अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांच्या मार्गदर्शनात पाच सदस्यीय समिती तयार केली आहे. मेडिकलमध्ये गुरुवारी पहिला संशयित रुग्ण दाखल झाला आहे. त्याची प्रकृती स्थिर असून नमुन्याचा अहवाल शनिवार किंवा सोमवारी येण्याची शक्यता आहे.

टॅग्स :indira gandhi medical college, Nagpurइंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो)corona virusकोरोना