शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

मेयो : डॉक्टरकडून रुग्णाला मारहाण प्रकरणी मागितले स्पष्टीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 23:40 IST

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालायतील (मेयो) क्ष-किरण विभागात ‘एक्स-रे’ काढताना रुग्णाला करण्यात आलेल्या मारहाणीने खळबळ उडाली आहे. वैद्यकीय अधीक्षकांनी मंगळवारी अस्थिव्यंगोपचार व क्ष-किरण विभागाला घटनेची चौकशी करून स्पष्टीकरण मागितले आहे.

ठळक मुद्देआर्थाे, रेडिओलॉजी विभागातील घटना

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालायतील (मेयो) क्ष-किरण विभागात ‘एक्स-रे’ काढताना रुग्णाला करण्यात आलेल्या मारहाणीने खळबळ उडाली आहे. वैद्यकीय अधीक्षकांनी मंगळवारी अस्थिव्यंगोपचार व क्ष-किरण विभागाला घटनेची चौकशी करून स्पष्टीकरण मागितले आहे.सतीश नावाच्या रुग्णाचा मांडीचे हाड तुटल्याने नातेवाईकांनी मेयोच्या अस्थिव्यंगोपचार विभागात दाखल केले. शस्त्रक्रियेसाठी वरिष्ठ डॉक्टरांनी आपल्या कनिष्ठ डॉक्टरला एक्स-रे करण्याचा सूचना दिल्या. रुग्णाचा एक्स-रे काढताना रुग्णाला असह्य वेदना होत होत्या. यामुळे योग्य पद्धतीचा एक्स-रे येत नव्हता. यामुळे कनिष्ठ डॉक्टराने रुग्णाचे दोन्ही पाय पकडले. त्याची ओढाताण केली. रुग्ण वारंवार पाय वर करीत असल्याने रागाच्याभरात डॉक्टरने त्याला मारहाण केली. रुग्णाच्या एका नातेवाईकाने आपल्या मोबाईलमध्ये या घटनेचे चित्रीकरण केले. वरिष्ठ डॉक्टरांचे रुग्णांकडे लक्ष नसल्याने असे प्रकार होत असल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. संबंधित डॉक्टराचे भविष्य धोक्यात येऊ नये म्हणून नातेवाईक तक्रार करण्यास तयार नाहीत, परंतु हा प्रकार थांबावा म्हणून व्हिडीओ व्हायरल केल्याचे त्यांचे म्हणणे आहे. ‘लोकमत’ने सर्वप्रथम ही घटना उजेडात आणताच खळबळ उडाली. प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. सागर पांडे यांनी अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया यांच्या सूचनेनुसार अस्थिव्यंगोपचार विभाग व रेडिओलॉजी विभागाला या प्रकरणाच्या संदर्भात चौकशी करून स्पष्टीकरण देण्याचे पत्र दिले आहे.तंत्रज्ञ असताना डॉक्टरांवर एक्स-रे काढण्याची वेळरुग्णाचा एक्स-रे काढताना संबंधित तंत्रज्ञाने मदत करायची असते. परंतु या घटनेत तंत्रज्ञ एक्स-रे काढताना तर अस्थिव्यंगोपचार विभागातील डॉक्टर रुग्णाची पाय धरून पोझिशन देतानाचा प्रकार समोर आला. येथील तंत्रज्ञ रुग्णाला कधीच मदत करीत नसल्याच्याही तक्रारी आहेत. शिवाय, लेक्चर्स जागेवर राहत नसल्याने अशा घटना नेहमीच घडत असल्याचे सूत्राचे म्हणणे आहे.

 

टॅग्स :indira gandhi medical college, Nagpurइंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो)doctorडॉक्टर