शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

मेयो : जन्मजात मूकबधिर २७ चिमुकले बोलू लागली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 22:25 IST

मेयोच्या ‘कान, नाक, घसा (ईएनटी) विभागात आतापर्यंत ३२ चिमुकल्यांवर या इम्प्लांटची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. यातील २७ चिमुकल्यांना ‘स्पीच थेरपी’चे प्रशिक्षण देऊन बोलते करण्यात आले.

ठळक मुद्देईएनटी विभागात पुन्हा पाच मुलांवर कॉक्लीअर इम्प्लांट

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : श्रवणदोष असल्याने त्या चिमुकल्यांना जन्मापासून ऐकू येत नव्हते. त्यांनी जगातला कोणताच आवाज ऐकला नव्हता. यामुळे त्यांना बोलताही येत नव्हते. यावर प्रभावी असणारे महागडे ‘कॉक्लीअर इम्प्लांट’ खरेदी करणेही शक्य नव्हते. अशा रुग्णांची दखल मेयोच्या ‘कान, नाक, घसा (ईएनटी) विभागाचे प्रमुख डॉ. जीवन वेदी यांनी घेतली. त्यांनी स्वत: या शस्त्रक्रियेचे कौशल्य आत्मसात केले, आणि शासनाच्या मदतीने विभागात कॉक्लीअर इम्प्लांट केंद्र सुरू केले. आतापर्यंत ३२ चिमुकल्यांवर या इम्प्लांटची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. यातील २७ चिमुकल्यांना ‘स्पीच थेरपी’चे प्रशिक्षण देऊन बोलते करण्यात आले. शनिवारी पुन्हा पाच बालकांवर कॉक्लीअर इम्प्लांटची शस्त्रक्रिया करण्यात आली.जन्मजात श्रवणदोषावर ‘कॉक्लिअर इम्प्लांट’ हा अद्ययावत पर्याय आहे. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) ईएनटी विभागात कॉक्लीअर इम्प्लांट केंद्र डॉ. वेदी यांनी २०१७ मध्ये सुरू केले. हे केंद्र सुरू करणारे विदर्भातील शासकीय रुग्णालयात मेयो पहिले रुग्णालय ठरले. या केंद्राचा फायदा गरजुंना होऊ लागला आहे. सुरूवातीला चार रुग्णांवर यशस्वी ‘इम्प्लांट’ केल्यानंतर पुढे हा आकडा वाढतच जात आहे. शनिवार २२ डिसेंबर रोजी पुन्हा पाच बालकांवर ‘कॉक्लीअर इम्प्लांट’ करण्यात आले. आतापर्यंत ३२ मुलांवर ही शस्त्रक्रिया झाली आहे. शनिवारी झालेली शस्त्रक्रिया पद्मश्री डॉ. मिलिंद किर्तने यांच्या देखरेखीखाली डॉ. वेदी, डॉ विपिन ईखार व ईएनटी विभागातील चमू यांनी केली. शस्त्रक्रियेसाठी भूल देण्याची जबाबदारी डॉ शीतल दलाल, डॉ रामतानी व चमू यांनी पार पाडली. अधिष्ठाता डॉ अजय केवलिया व वैद्यकीय अधीक्षक डॉ संध्या मांजरेकर यांनी इम्प्लांट चमूचे कौतुक केले. या केंद्राचा लाभ जास्तीत गरजू लोकांनी घ्यावा, असे आवाहन डॉ. वेदी यांनी केले आहे.

टॅग्स :indira gandhi medical college, Nagpurइंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो)