शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मेयो : डॉक्टरांच्या संपामुळे रुग्णसेवा प्रभावित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2019 00:13 IST

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) प्रवेशावरून सुरक्षारक्षक आणि नातेवाईक यांच्यात झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर निवासी डॉक्टर बुधवारपासून संपावर गेले. गुरुवारी हा संप कायम राहिल्याने रुग्णसेवा प्रभावित झाली. नियोजित शस्त्रक्रियाही पुढे ढकलण्यात आल्याने याचा फटका रुग्णांना बसला. सुरक्षेवर तोडगा काढण्यासाठी रात्री उशिरापर्यंत मार्डचे पदाधिकारी अधिष्ठाता कक्षात ठाण मांडून होते.

ठळक मुद्देसंपाचा दुसरा दिवस : शस्त्रक्रिया ढकलल्या पुढे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) प्रवेशावरून सुरक्षारक्षक आणि नातेवाईक यांच्यात झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर निवासी डॉक्टर बुधवारपासून संपावर गेले. गुरुवारी हा संप कायम राहिल्याने रुग्णसेवा प्रभावित झाली. नियोजित शस्त्रक्रियाही पुढे ढकलण्यात आल्याने याचा फटका रुग्णांना बसला. सुरक्षेवर तोडगा काढण्यासाठी रात्री उशिरापर्यंत मार्डचे पदाधिकारी अधिष्ठाता कक्षात ठाण मांडून होते.निवासी डॉक्टरांनीच रुग्ण व नातेवाईकांसाठी पास प्रणाली सुरू केली. यामुळे एका पासवर एक रुग्ण व जास्तीत जास्त दोन नातेवाईक सोडण्याचा नियम घालून दिला. आपात्कालीन विभाग असो की वॉर्ड, हा नियम सर्वांसाठी आहे. आदेशानुसार सुरक्षारक्षक याचे सक्तीने पालनही करतात. मात्र यामुळे अनेकवेळा तणावाची स्थिती निर्माण होते. गेल्या महिन्यात यावरूनच तीन वेळा सुरक्षारक्षकांना लक्ष्य केले. बुधवारी पुन्हा ही घटना घडली. जबरदस्तीने अपात्कालीन विभागात शिरत शिवीगाळ केली, सुरक्षारक्षकांवर हातही उगारला. काही वेळानंतर शंभरावर नातेवाईकांचा जमाव आला आणि सुरक्षारक्षकांच्या अंगावर धावून गेले. मेयोचे प्रवेशद्वार बंद केल्यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र यात डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याने निवासी डॉक्टरांनी संपाचे हत्यार उपसले. या संपाला सामूहिक सुटी असे नाव देत २५० वर निवासी डॉक्टरांनी गुरुवारीही काम बंद आंदोलन कायम ठेवले.संपावर तोडगा काढण्याचा प्रयत्नमेयोचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया यांनी गुरुवारी यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्यांनी तातडीने मेडिकल कौन्सिलची बैठक घेतली. परंतु मार्ग निघाला नाही. मेयो प्रशासनाने पोलीस आयुक्तांशीही चर्चा केली. मेयोत पोलीस चौकी सुरू करावी, पोलीस निरीक्षक दर्जाचा अधिकारी आणि बंदुकधारी पोलीस तैनात करावा या मागणीवर निवासी डॉक्टर अडून बसले आहेत. पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी याला मंजुरी दिली आहे. मात्र मार्डचे पदाधिकारी लेखी उत्तरावर अडून बसल्याने संपाचा तिढा कायम आहे.कामावर परतण्याचे दिले पत्रअधिष्ठाता डॉ. केवलिया यांनी संपात सहभागी झालेल्या निवासी डॉक्टरांना तातडीने कामावर परतण्याचे पत्र दिले. ‘लोकमत’शी बोलताना ते म्हणाले, निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेची जबाबदारी प्रशासनाची आहे. त्यासाठी पूर्ण प्रयत्न सुरू आहेत. आश्वासनही देण्यात आले आहे. परंतु त्यानंतरही संप कायम आहे. यामुळे कामावर तातडीने परतण्याचे पत्र दिले आहे. संप नियमाला धरून नसल्याचेही ते म्हणाले.

 

टॅग्स :indira gandhi medical college, Nagpurइंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो)Strikeसंप