शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
2
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
3
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
4
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
5
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
6
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
7
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
8
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
9
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
10
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
11
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
12
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
13
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
14
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
15
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
16
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
17
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ
18
क्या बात! रितेश देशमुखच्या आईसाहेबांनी बल्बच्या प्रकाशात घेतलं ड्रॅगन फ्रूटचं पीक; सूनबाईंना कौतुक, शेअर केला व्हिडीओ
19
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

‘यू टर्न’ घेऊ शकतो नागपुरातील स्ट्राँग रूम व्हिडिओ प्रकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 22:37 IST

धंतोली येथील बचत भवन स्ट्राँग रुममध्ये ईव्हीएम मशीन ठेवताना मोबाईलने रेकॉर्डिंग केल्याचा प्रकार तिथे उपस्थित अधिकाऱ्यांनी मौन बाळगल्यामुळेच वाढला. ही रेकॉर्डिंग उमेदवाराच्या जवळच्याच एका व्यक्तीने केली होती. या प्रकरणाचा तपास करीत असलेले पोलीस रेकॉर्डिंग करणाऱ्याला शोधत आहे. सीसीटीव्ही फुटेजवरून त्याचा शोध घेतला जात आहे. तो सापडल्यास हे प्रकरण ‘यू टर्न’ होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देउमेदवाराच्या जवळच्याच व्यक्तीने बनवली होती क्लीपिंगपोलिसांच्या तपासात आले उघडकीस

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : धंतोली येथील बचत भवन स्ट्राँग रुममध्ये ईव्हीएम मशीन ठेवताना मोबाईलने रेकॉर्डिंग केल्याचा प्रकार तिथे उपस्थित अधिकाऱ्यांनी मौन बाळगल्यामुळेच वाढला. ही रेकॉर्डिंग उमेदवाराच्या जवळच्याच एका व्यक्तीने केली होती. या प्रकरणाचा तपास करीत असलेले पोलीस रेकॉर्डिंग करणाऱ्याला शोधत आहे. सीसीटीव्ही फुटेजवरून त्याचा शोध घेतला जात आहे. तो सापडल्यास हे प्रकरण ‘यू टर्न’ होण्याची शक्यता आहे.२७ मार्च रोजी काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांनी बचत भवनमध्ये ईव्हीएम मशीन ठेवतांना सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचा आरोप केला होता. पटोले आणि काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी हे षड्यंत्र असल्याचे म्हटले होते. त्यांनी यासंदर्भात मोबाईल रेकॉर्डिंग दाखवत जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्याकडे तक्रारही केली होती. यानंतर या प्रकरणाने जोर पकडला. विकास ठाकरेंच्या तक्रारीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सीसीटीव्ही बंद असल्याचा आरोप स्पष्टपणे खारीज केला. त्यावेवळी स्ट्राँग रूमधील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे सुरु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. स्क्रिन बंद असणे म्हणजे कॅमेरा बंद आहे, असे होत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले होते.आतापर्यंतच्या पोलीस तपासात या प्रकरणाची खरी माहिती पुढे येत आहे. सूत्रानुसार घटनेच्या दिवशी २७ मार्च रोजी दुपारी ४.३० ते सायंकाळी ६.४० वाजतादरम्यान स्ट्राँग रूममध्ये ईव्हीएम ठेवण्यात आले होते. या दरम्यान तिथे तैनात पोलीस दलाने स्ट्राँग रूमचा कार्यभार जिल्हा प्रभारीला सोपविला होता. पोलीस कर्मचारी केवळ सुरक्षा व्यवस्था सांभाळत होते. ईव्हीएम ठेवण्यासाठी उमेदवारांच्या प्रतिनिधीला बोलावण्यात आले होते.प्रतिनिधींमध्ये सहभागी असलेल्या एका युवकास टीव्हीवरील स्क्रीन बंद असल्याचे आढळून येताच त्याने मोबाईलने रेकॉर्डिंग केली. सूत्रानुसार युवकास मोबाईलने रेकॉर्डिंग करताना पाहून एका पोलीस कर्मचाऱ्याने अधिकाऱ्यांना सूचना दिली. त्या अधिकाऱ्याने याकडे दुर्लक्ष केले. अधिकाऱ्याची भूमिका पाहता पोलीस कर्मचारीही शांत बसला. विकास ठाकरे यांनी तक्रार केल्यावर या प्रकरणाने जोर धरला.२९ मार्च रोजी ज्या पद्धतीने तक्रार दाखल करण्यात आली, त्यामुळे पोलीसही हादरले. या तक्रारीुसार पोलिसांनी केवळ अदखलपात्र गुन्हा (एनसी) दाखल केली. दुसऱ्या दिवशी ३० मार्च रोजी पोलिसांनी दखलपात्र गुन्हा नोंदवून तपास सुरु केला. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून तहसीलदारांनी तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार ५.५५ वाजताची ही घटना असल्याचे सांगण्यात आले. तेव्हा स्ट्राँग रूमची जबाबदारी प्रभारींकडे होती. पोलीस कर्मचाऱ्यांनी मोबाईल रेकॉर्डिंग होत असल्याची बाब निदर्शनास आणून दिली तेव्हा जिल्हा प्रशासनाचे अधिकारी (प्रभारी) तातडीने कारवाई करू शकले असते. त्यांनी ही बाब गांभीर्याने न घेतल्यानेच प्रकरण वाढले.पोलिसांनी गोळा केले पुरावेसूत्रानुसार पोलिसांनी या प्रकरणाशी संबंधित अनेक पुरावे गोळा केले आहेत. या माध्यमातून खरी बाजू समोर येऊ शकते. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी काही लोकांचे बयाण सुद्धा नोंदवून घेतले आहे. प्रकरण संवेदनशील असल्याने पोलीस अतिशय काळजीपूर्वक पाऊल टाकत आहे. पोलिसांना आरोपीच्या पिंजऱ्यात टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचे पितळ उघडे पडल्यास त्यांची बोलती बंद होईल, असा पोलिसांना विश्वास आहे.

 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnagpurनागपूर