विधान परिषद निवडणूक : नगर पंचायतीबाबत अद्याप निर्णय नाहीप्राप्त माहितीनुसार नव्याने स्थापन झालेल्या नगर पंचायतीच्या सदस्यांनाही मताधिकार देण्याबाबत विचार सुरू आहे. गेल्या निवडणुकीच्या वेळी शहर व ग्रामीण मिळून ४४० मतदार होते. आता मौदा व महादुला या दोन नगर पंचायती तर कन्हान व वाडी या दोन नगर परिषदा नव्याने निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे मतदारसंख्या ५३१ वर गेली आहे. शहराचा विचार करता नागपूर महापालिकेतील १५० नगरसेवक मतदार आहेत. उर्वरित ३८१ मतदार हे जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, नगर परिषद सदस्यांच्या रुपात नागपूर ग्रामीणमधील आहेत. त्यामुळे मतदारसंख्येत ग्रामीणचे पारडे जड असल्याचे दिसते. आता नगर परिषदेती नामनिर्देशित सदस्यांना या निवडणुकीत मताधिकार न देण्याचा विचार सुरू आहे. तसे झाले तर २९ नामनिर्देशित सदस्य कमी होतील.नुकतेच हिंगणा, कुही व भिवापूर या नव्याने स्थापन करण्यात आलेल्या नगर पंचायतीच्या निवडणुका झाल्या. या तिन्ही नगर पंचायतीमध्ये एकूण ५१ नगरसेवक निवडून आले आहेत. नगराध्यक्षांची निवडणूक व्हायची आहे. स्थायी समिती अध्यक्षांची निवड झालेली नाही. अशात या नवनियुक्त ५१ सदस्यांना मतदानाचा अधिकार द्यायचा की नाही यावरही विचार सुरू आहे. संबंधित सदस्यांना मताधिकार देण्यात आला तर मतदार संख्या आणखी ५१ ने वाढेल. त्यामुळे निवडणुकीत एकूण मतदारसंख्या किती असेल हे निवडणूक आयोगाने अधिसूचना जारी केल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.
नामनिर्देशितांच्या मताधिकारवर गदा
By admin | Updated: November 14, 2015 03:04 IST