शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
3
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
4
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
5
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
6
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
7
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
8
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
9
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
10
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
11
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
12
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
13
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
14
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
15
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
16
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
17
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
18
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
19
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
20
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  

‘मामा’ च्या हत्याकांडातील सूत्रधार अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 22:12 IST

१५ हजार रुपयांसाठी झालेल्या वादातून रविवारी रात्री गुंडांनी २५ वर्षीय आनंद शिरपूरकर याची हत्या केली होती. या घटनेनंतर कोतवाली पोलिसांनी समीर शेंडे, यश गोस्वामी, प्रफुल्ल शिवरेकर व प्रदीप काळे यांना अटक केली होती. सोमवारी रात्री हत्येचा सूत्रधार रितेश शिवरेकर यालाही अटक करण्यात आली. पोलिसांनी बुधवारी आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने ३ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

ठळक मुद्दे३ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी : वस्तीमध्ये शोककळा

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : १५ हजार रुपयांसाठी झालेल्या वादातून रविवारी रात्री गुंडांनी २५ वर्षीय आनंद शिरपूरकर याची हत्या केली होती. या घटनेनंतर कोतवाली पोलिसांनी समीर शेंडे, यश गोस्वामी, प्रफुल्ल शिवरेकर व प्रदीप काळे यांना अटक केली होती. सोमवारी रात्री हत्येचा सूत्रधार रितेश शिवरेकर यालाही अटक करण्यात आली. पोलिसांनी बुधवारी आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने ३ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.मृत आनंदचे रितेश शिवरेकर याच्यावर ८ हजार रुपये होते तर रितेशचे वस्तीतील मनोज मेहर याच्यावर १५ हजार रुपये होते. त्यासाठी रितेश मनोजसोबत वाद घालत होता. त्यामुळे आनंदने रितेशला ८ हजार रुपये कापून मनोजकडून ७ हजार रुपये घेण्यास सांगितले. त्यामुळे रितेश संतप्त झाला. त्याने चर्चेसाठी आनंदला बोलावून मित्राच्या मदतीने त्याची हत्या केली.आनंद मूळचा उमरेड येथील रहिवासी होता. त्याची आई व बहीण उमरेडमध्ये राहते. आठ वर्षापूर्वी तो गुजरवाडी येथे आला होता. टाईल्स विक्रीचा व्यवसाय करीत होता. त्याचा स्वभाव मनमिळावू होता. अनेकांना तो आर्थिक मदतही करीत होता. गुजरवाडीतील सर्व लोक त्याला ‘मामा’ म्हणायचे. वस्तीतील सर्वांचाच तो मामा होता. वस्तीतील कुठल्याही कार्यक्रमात तो सक्रिय असायचा. वस्तीतील कुणालाही मदतीची गरज भासल्यास ते आनंदकडेच यायचे. त्याच्या स्वभावामुळे नेहमीच त्याच्या घरी, लोकांचा गोतावळा रहायचा. वस्तीच्या लोकांचे म्हणणे आहे की, आनंदबद्दल प्रत्येकाला आदर होता. आनंदने फक्त वाद निपटावा म्हणून रितेशला म्हटले होते. मदतीच्या भावनेतून आनंदला आपला जीव गमवावा लागला. वस्तीच्या लोकांनी आनंदची हत्या केलेल्या आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.आनंदवर असलेल्या प्रेमापोटी गुजरवाडी मित्र मंडळाचे कार्यकर्ते व नागरिक दु:खी आहे. त्यांनी होर्डींग, बॅनर लावून आनंदला श्रद्धांजली दिली आहे.रितेशच्या बहिणीला अटक करण्याची मागणीगुरजवाडीच्या लोकांनी या हत्याकांडासाठी रितेशच्या बहिणीला दोषी ठरविले आहे. त्यांचे म्हणणे आहे की, हल्ल्यातून रितेशच्या हातातून चाकू सुटल्यामुळे आनंद जीव वाचवून तेथून पळाला. तो मंगेश निनावे याच्या घरात लपून बसला होता. रितेशच्या बहिणीने आनंद लपून बसल्याचे सांगितले. त्यामुळे रितेशने घरात शिरून परत आनंदवर हल्ला केला. वस्तीच्या लोकांनी कोतवाली पोलीस ठाणे गाठून रितेशच्या बहिणीला अटक करण्याची मागणी केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखून