शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

हॉटस्पॉट कोरोनामुक्त करण्यासाठी मास्टर प्लॅन : मनपा आयुक्तांची संकल्पना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2020 20:42 IST

नागपूर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. रुग्णांची संख्या वाढीसाठी काही ‘हॉटस्पॉट’ कारणीभूत ठरले आहेत. शहरातून कोरोना हद्दपार करण्यासाठी आता मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या संकल्पनेतून ‘मास्टर प्लॅन’ तयार करण्यात आला आहे.

ठळक मुद्देबाधिताच्या संपर्कात येणाऱ्यांना क्वारंटाईन करणार

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नागपूर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. रुग्णांची संख्या वाढीसाठी काही ‘हॉटस्पॉट’ कारणीभूत ठरले आहेत. शहरातून कोरोना हद्दपार करण्यासाठी आता मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या संकल्पनेतून ‘मास्टर प्लॅन’ तयार करण्यात आला आहे. त्यानुसार ‘हॉटस्पॉट’मधील कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संपर्कात येणाºया लोकांचा शोध घेऊन त्यांना क्वॉरंटाईन करण्यात येत आहे. या सर्वांचे कोरोना ‘स्वॅब’ घेतले जात आहेत. मास्टर प्लॅननुसार कोरोनाचे ‘हॉटस्पॉट’ ठरलेल्या सतरंजीपुरा भागात कार्य सुरू झाले आहे. आतापर्यंत सतरंजीपुरा भागातील १७०० पेक्षा जास्त जणांना क्वारंटाईन करून मनपाच्या ‘कोविड केअर सेंटर’मध्ये आणण्यात आले आहे.सध्या शहरात कोरोनाचे १३४ पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. यापैकी बहुतांश रुग्ण हे सतरंजीपुरा भागातीलच आहेत. त्यामुळे या भागातील कोरोना संसर्गाची साखळी खंडित करण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न मनपातर्फे केले जात आहेत. सतरंजीपुरा परिसरात एका कोरोनाबाधित व्यक्तीमुळे कोरोनाच्या संसर्गाची मोठी साखळी निर्माण झाली. ही साखळी खंडित करण्यासाठी पॉझिटिव्ह रुग्ण राहत असलेल्या परिसरातील २८० घरांमधील १७०० पेक्षा जास्त लोकांना ‘क्वारंटाईन’ करून त्यांना ‘कोविड केअर सेंटर’मध्ये दाखल करण्यात आले आहे. या सर्वांचे ‘स्वॅब’ घेण्याचे काम सुरू आहे. ‘स्वॅब’ पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णावर जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार उपचारही सुरू आहेत.

४० रुग्ण पूर्णपणे बरे झालेशहरात आतापर्यंत १४५ कोविड-१९ पॉझिटिव्ह रुण आढळले असून यापैकी ४० रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत तर दोघांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत शहरात सुमारे ९६ ‘अ‍ॅक्टिव्ह’ केसेस असून त्यापैकी ८८ रुग्ण फक्त सतरंजीपुरा परिसरातील आहेत. त्यामुळे या भागातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मनपातर्फे अहोरात्र काम सुरू आहे. नागरिकांनीही कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त मुंढे यांनी केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याtukaram mundheतुकाराम मुंढे