शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

नागपूर औषध कंपनीत भीषण स्फोट ! एकाचा मृत्यू, सहा जखमी

By शुभांगी काळमेघ | Updated: June 17, 2025 17:52 IST

Nagpur : स्फोटाचे नेमके कारण काय? पोलिस तपासात गुंतले

नागपूर : नागपूरच्या भीलगाव येथील अंकित पल्प्स अँड बोर्ड्स प्रायव्हेट लिमिटेड या औषधनिर्मिती कंपनीच्या युनिटमध्ये मंगळवारी भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असून, सहा जण जखमी झाले आहेत.

स्फोट सकाळी सुमारे ११ वाजता झाला असल्याची माहिती आहे. कंपनीतील 'ग्लास-लाइन्ड रिएक्टर'मध्ये अचानक स्फोट होऊन मोठा आगीचा भडका उडाला. या घटनेत एक व्यक्ती जागीच ठार झाला, तर सहा जण गंभीर जखमी झाले. सर्व जखमींना कामठी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे.

अंकित पल्प्स अँड बोर्ड्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी मायक्रोक्रिस्टलाइन सेलुलोज (MCC) तयार करते. MCC औषधनिर्मिती आणि खाद्य उद्योगात वापरली जाते. या कंपनीचे उत्पादन मुख्यतः औषधांच्या आणि खाद्यपदार्थांच्या निर्मितीसाठी आवश्यक असते.

स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी घटनास्थळाचा तपास सुरू केला असून, 'ग्लास-लाइन्ड रिएक्टर'मध्ये कोणत्या कारणामुळे स्फोट झाला याचा शोध घेत आहेत. कंपनीतील सुरक्षा उपायांचीही तपासणी केली जात आहे.

ही घटना एक वर्षांपूर्वी, १७ डिसेंबर २०२३ रोजी नागपूरच्या बाजारगाव येथील सोलर इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड कंपनीत झालेल्या स्फोटाच्या आठवणी ताज्या करते. त्या दुर्घटनेत ९ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर सुरक्षा उपायांबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. 

नागपूरचे पोलिस आयुक्त रविंद्र सिंगल यांनी या दुर्घटनेची गंभीर दखल घेतली आहे. प्राथमिक तपासानुसार, स्फोटाच्या कारणांचा शोध घेतला जात आहे. प्रशासनाने जखमींना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.

 

टॅग्स :nagpurनागपूर