शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यातील चौघांचे हत्याकांड प्रकरण : तिघांची फाशी रद्द करून मरेपर्यंत जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 21:46 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शेतीच्या वादातून चौघांचा निर्घृण खून करणाऱ्या तीन आरोपींची फाशीची शिक्षा रद्द करून त्यांना नैसर्गिक मृत्युपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

ठळक मुद्देहायकोर्टाचा निर्णय : शेतीच्या वादातून घडले होते हत्याकांड

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शेतीच्या वादातून चौघांचा निर्घृण खून करणाऱ्या तीन आरोपींची फाशीची शिक्षा रद्द करून त्यांना नैसर्गिक मृत्युपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. न्यायमूर्तीद्वय झेड. ए. हक व पुष्पा गणेडीवाला यांनी शुक्रवारी हा निर्णय जाहीर केला. हे प्रकरण अकोला जिल्ह्यातील आहे.गजानन वासुदेव माळी, नंदेश गजानन माळी व दीपक गजानन माळी अशी आरोपींची नावे असून ते उरळ, ता. बाळापूर येथील रहिवासी आहेत. राजेश, योगेश व विश्वनाथ माळी आणि वनमाला रोकडे अशी मयतांची नावे होती. राजेश व योगेश सख्खे भाऊ होते. विश्वनाथ हे त्यांचे काका होते तर, वनमाला चुलत बहीण होती. राजेश व योगेशचे वडील भगवंतराव यांनी आरोपी गजानन माळीसोबत दोन एकर शेती खरेदीचा करार केला होता. त्यानंतर गजाननने करार नाकारला. त्यामुळे भगवंतरावने दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला असता त्यांना शेतीचा ताबा देण्यात आला. दरम्यान, १४ एप्रिल २०१४ रोजी मयत राजेश व योगेश शेतात गेले असता गजाननने त्यांना ठार मारण्याची धमकी दिली. परिणामी, योगेशने गजाननविरुद्ध उरळ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. तेथून योगेश व राजेश हे बाखराबादला विश्वनाथकडे गेले. दरम्यान, राजेश घरीच थांबला तर, योगेश व वनमाला शेतात गेले. त्यांच्या पाठोपाठ आरोपीही शेतात गेले व त्यांनी कडबा कटरचे पाते व कुºहाडीने योगेश व वनमालावर सपासप वार करून त्यांना जाग्यावरच ठार केले. त्यानंतर तिन्ही आरोपी हे विश्वनाथच्या घरी गेले. त्या ठिकाणी आरोपींनी राजेश व विश्वनाथ यांचा खून केला. विश्वनाथची पत्नी पार्वती या घटनेची प्रत्यक्षदर्शी साक्षिदार आहे.सत्र न्यायालयाने तिन्ही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर ही शिक्षा कायम करण्यासाठी उच्च न्यायालयासमक्ष प्रकरण सादर केले होते. तसेच, आरोपींनी सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाने यावर एकत्रित सुनावणी घेतल्यानंतर विविध बाबी लक्षात घेता हा सुधारित निर्णय दिला. आरोपींतर्फे अ‍ॅड. अविनाश गुप्ता व अ‍ॅड. आकाश गुप्ता तर, सरकारतर्फे अ‍ॅड. तहसीन मिर्झा यांनी कामकाज पाहिले.

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयMurderखूनAkolaअकोलाCapital Punishmentमृत्यूदंडLife Imprisonmentजन्मठेप