शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

मतिमंद मुलीवर सामूहिक अत्याचार

By admin | Updated: May 22, 2015 02:33 IST

मतिमंद मुलीला धाक दाखवून, मारहाण करून वसतिगृहातील दोन नराधमांनी तिच्यावर वारंवार अत्याचार केले.

वसतिगृहातील नराधमांचे कुकृत्य : मुलीला गर्भधारणा नागपूर : मतिमंद मुलीला धाक दाखवून, मारहाण करून वसतिगृहातील दोन नराधमांनी तिच्यावर वारंवार अत्याचार केले. या घृणित कृत्याची मोबाईलवरून ‘क्लिप’ही बनविली. पीडित मुलगी घरी गेल्यानंतर ती गर्भवती असल्याचे तिच्या आईच्या लक्षात आले. त्यानंतर ही संतापजनक घटना उघडकीस आली. पीडित मुलगी १६ वर्षांची आहे. तिच्या घरची स्थिती हलाखीची असल्यामुळे तिच्या आईने तिला चार वर्षांपूर्वी प्रतापनगर चौकातील बालविकास अपंग शाळेच्या वसतिगृहात घातले. यंदा तिने दहावीची परीक्षा दिली. पाच महिन्यांपूर्वी एक दिवस ती नैसर्गिक विधीला गेली असताना आरोपी वसतिगृहाचा गार्ड किसन बावणे (वय ५७) याने तिच्यावर पाशवी अत्याचार केला. तो हे कुकृत्य करताना स्वयंपाकी भरत कांबळी (वय ४४) याने पाहिले. त्याने हा अत्याचार उघड करण्याऐवजी तो सुद्धा पापाचा भागीदार बनला. त्यानेही तिच्यावर अत्याचार केला. नंतर हे नराधम तिच्यावर नेहमीच आळीपाळीने अत्याचार करू लागले. कळस म्हणजे एक नराधम अत्याचार करीत असताना दुसऱ्याने मोबाईलवरून त्याची क्लिप तयार केली. मुलीने संबंधाला नकार दिल्यास ही क्लिप दाखवून बदनामी करण्याचा धाक दाखवून तर कधी मारहाण करून ते तिचे लैंगिक शोषण करीत होते. चार महिन्यांपासून सातत्याने शरीरसंबंध प्रस्थापित होत असल्यामुळे मुलीला गर्भधारणा झाली. दरम्यान, शाळेला सुटी लागल्यामुळे मुलीच्या आईने तिला घरी नेले. ती सारखी ओकारी करीत असल्यामुळे तिला डॉक्टरकडे नेले. डॉक्टरने पीडित मुलगी गर्भवती असल्याचे सांगितले. त्यामुळे हादरलेल्या आईने मुलीला विचारणा केली. हा घृणित प्रकार उघड झाल्यानंतर मुलीच्या आईने बुधवारी प्रतापनगर ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी सामूहिक अत्याचार तसेच बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ तसेच अनुसुचित जाती-जमाती अत्याचार विरोधी कायद्यान्वये गुन्हा नोंदविला. (प्रतिनिधी)रक्षक बनला भक्षक : ‘रक्षकच भक्षक बनला’ या म्हणीचा प्रत्यय देणाऱ्या या घटनेतील दोन्ही नराधमांच्या एपीआय प्रशांत नागटिळक यांनी गुरुवारी मुसक्या बांधल्या. त्यांचे मोबाईलही जप्त केले. या वसतिगृहात आणखी अनेक मतिमंद मुली आहेत. त्यांच्यापैकी आणखी काही जणींसोबत या नराधमांनी असेच केले की काय, अशी शंका निर्माण झाली आहे. शाळेला सुटी लागल्यामुळे त्या आपापल्या घरी गेल्या आहेत. मतिमंद असल्याने त्यांना या अत्याचाराची जाणीव नाही. उघडकीस आलेल्या या घटनेने ‘संभाव्य धोक्याचे’ संकेत मिळाले असून, एक मोठे प्रकरणच बाहेर येते की काय, अशी भीती निर्माण झाली आहे.