शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाचे आमिष दाखवत विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार; एलएलबीच्या विद्यार्थ्याला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2022 20:29 IST

Nagpur News लग्नाचे आमिष दाखवत एका विद्यार्थिनीवर दोन तरुणांनी सामूहिक अत्याचार केल्याची बाब समोर आली आहे. यातील एक आरोपी एलएलबीचा विद्यार्थी असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

 

नागपूर : लग्नाचे आमिष दाखवत एका विद्यार्थिनीवर दोन तरुणांनी सामूहिक अत्याचार केल्याची बाब समोर आली आहे. यातील एक आरोपी एलएलबीचा विद्यार्थी असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. हिंगणा पोलीस ठाण्याअंतर्गत ही घटना घडली. पोलिसांनी आरोपी सुजात असीम शर्मा (२२, रा.धरमपेठ) व वृषभ गजभिये (२४, रा.चंद्रपूर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून सुजातला अटक केली आहे.

सुजात शर्मा हा एलएलबीच्या अंतिम वर्षाचा विद्यार्थी आहे. २४ वर्षीय पीडित विद्यार्थिनी ही सुजातच्या शाळेत शिकत होती. त्यांची अगोदरपासून ओळखी होती. विद्यार्थिनीच्या तक्रारीनुसार, जानेवारी महिन्यात सुजात अनेक दिवसांनी पुन्हा मुलीला भेटला. त्यानंतर दोघांमध्ये मोबाईलवर संभाषण सुरू झाले. लग्नाच्या बहाण्याने सुजातने विद्यार्थिनीवर बळजबरी केली. लग्नाचे आमिष दाखवत तो विद्यार्थिनीला हिंगणा येथील रिसॉर्टसह अनेक ठिकाणी घेऊन गेला. तेथे त्याने विद्यार्थिनीशी शारीरिक संबंध ठेवले. गेल्या काही काळापासून सुजातने लग्नाचा विषय निघाला की टाळाटाळ सुरू केली होती. विद्यार्थिनीने दबाव टाकल्याने त्याने त्याचा मित्र वृषभ गजभिये याचा मोबाईल क्रमांक दिला व त्याच्याशी बोलण्यास सांगितले.

वृषभचा क्रमांक दिल्यानंतर सुजातने मुलीचा फोन उचलणेही बंद केले. सुजातची सत्यता जाणून घेण्यासाठी विद्यार्थिनीने वृषभ गजभिये याच्याशी संपर्क साधला. मदत करण्याच्या बहाण्याने वृषभने विद्यार्थिनीला हॉटेलमध्ये बोलावले. तेथे त्याने तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. यानंतर मुलीने हा प्रकार घरच्यांना सांगितला. कुटुंबीयांकडून लगेच हिंगणा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. याप्रकरणी शारीरिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करून सुजात शर्माला अटक करण्यात आली आहे.

घरात शिरून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

हिंगण्यातच एका तरुणाने अल्पवयीन मुलीला वासनेचा शिकार बनविले. वर्धा जिल्ह्यातील आर्वीतील २१ वर्षीय वैभव रंगनाथ बोंडवे याने १३ वर्षीय पीडित मुलीला आपल्या जाळ्यात ओढले. २३ मे रोजी दुपारी मुलगी घरात एकटीच होती. त्यावेळी वैभव हा मुलीच्या घरी शिरला व त्याने तरुणीशी बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले. यादरम्यान मुलीची आईच्या घरी आल्याने वैभवने तेथून पळ काढला. मुलीने सत्य परिस्थिती आईला सांगितली. आईच्या तक्रारीवरून हिंगणा पोलिसांनी शारीरिक अत्याचार आणि पोक्सोचा गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी