डिझेलमध्ये सर्वाधिक मायलेज : आधुनिक तंत्रज्ञान, हायटेक सुरक्षा वैशिष्ट्येनागपूर : लक्झरी कारच्या दुनियेत मारुती सुझुकीने नवीन सियाज कार सोमवारी नागपुरातील चारही शोरूममध्ये एका छोटखानी समारंभात दाखल केली. ही कार कंपनीच्या सी-सेगमेंटच्या एसएक्स-४ ला रिप्लेस करणार आहे. कारची होंडाच्या सिटी आणि ह्युंडईच्या वर्नाशी टक्कर राहील. सेवा आॅटोमोटिव्हमध्ये सोमवारी झालेल्या समारंभात शाखा व्यवस्थापक नितीन गुंडेचा आणि विक्री व्यवस्थापक इलियास शेख आणि ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पेट्रोल, डिझेल आणि आॅटो ट्रान्समिशनमध्ये नऊ मॉडेल आकर्षक रंगात आहेत. संपूर्ण देशात ८३०० कारचे बुकिंग झाले असून, सध्या बुकिंग सुरू असल्याचे शेख म्हणाले.सियाजमध्ये अनेक नव्या आधुनिक वैशिष्ट्यांचा समावेश केला आहे. त्यामुळे मारुती सुझुकीच्या ग्राहकांना ही कार हवीहवीशी वाटणारी आहे. सियाजमध्ये नव्या सुझुकीच्या डिझाईनची झलक दिसते. ही कार ९५ पीएसची पॉवर आणि १३० एनएमचा टार्क जनरेट करते. पेट्रोलमध्ये २०.७ कि़मी., आॅटो ट्रान्समिशनमध्ये १९.१ आणि डिझेलमध्ये २६.२३ कि़मी. मायलेज देते. पार्किंग कॅमेऱ्यासह रेअरव्ह्यू मिरर, की-लेस पुश स्टार्ट सिस्टिम, रिमोट कंट्रोल की, आॅटोमेटिक एसी सिस्टिम, स्टिअरिंग माऊंटेड कंट्रोल आदींसह डायनामिक स्टायलिंग, स्मार्टप्ले इन्फॉर्मेशन सिस्टिम, आरामदायक, कॅबिनमध्ये अॅडव्हान्स वैशिष्ट्ये, मायलेज व हायटेक सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत. सेवा अमरावती रोड, आॅटोमोटिव्ह कामठी रोड, आर्य कार्स ग्रेट नाग रोड व भंडारा रोड असे चार डीलर आहेत. (वाणिज्य प्रतिनिधी)
मारुती सुझुकीची ‘सियाज’ दाखल
By admin | Updated: October 7, 2014 01:04 IST