शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

पुलवामातील शहिदांच्या स्मृतिप्रीत्यर्थ साकारले शहीद स्मारक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2020 21:25 IST

व्हॅलेंटाईन डे साजरा करण्याच्या आनंदात अनेकांना मागील वर्षी १४ फेब्रुवारीला झालेल्या पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांचा विसर पडला आहे. परंतु नागपुरातील गायत्री अभय घुसे हिने मात्र पुलवामा हल्ल्यातील शहिदांचे स्मरणच केले नाही तर त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ एक आकर्षक शहीद स्मारक साकारून त्यांना आपली श्रद्धांजली वाहिली आहे.

ठळक मुद्देनागपुरातील गायत्री घुसेची कलाकृती

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : अख्खी तरुणाई व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यासाठी योजना आखत आहे. परंतु व्हॅलेंटाईन डे साजरा करण्याच्या आनंदात अनेकांना मागील वर्षी १४ फेब्रुवारीला झालेल्या पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांचा विसर पडला आहे. परंतु नागपुरातील गायत्री अभय घुसे हिने मात्र पुलवामा हल्ल्यातील शहिदांचे स्मरणच केले नाही तर त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ एक आकर्षक शहीद स्मारक साकारून त्यांना आपली श्रद्धांजली वाहिली आहे.गायत्री झिंगाबाई टाकळी येथील भारतीय कृषी विद्यालयात नवव्या वर्गात शिकते. तीन वर्षांपासून शाळेतून पहिली येण्याचा बहुमान तिला मिळत आहे. अभ्यासात हुशार असण्यासोबतच तिला कलाकृती साकारण्याची आवड आहे. ५ जानेवारीला गायत्रीचा वाढदिवस होता. आप्तस्वकीयांना बोलावून तिच्या कुटुंबीयांनी तिचा वाढदिवस साजरा केला. यात तिला भेट म्हणून काही रक्कम मिळाली. या रकमेचे काय करायचे असा विचार तिच्या मनात सुरू होता. पुलवामा घटनेला १४ फेब्रुवारीला एक वर्ष पूर्ण होत असल्याचे तिच्या लक्षात आले. त्यामुळे या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शहीद स्मारक साकारण्याचा निर्णय तिने घेतला. त्यासाठी तिने तयारी केली. लाकडाची स्टेनगन तयार केली. त्यावर टोपी घातली. ही कलाकृती आकर्षक दिसावी यासाठी तिने त्यावर ४४ लहान स्टोन लावले. स्टेनगनवर लावलेली टोपी आणखी चांगली दिसावी यासाठी तिने ती टोपी दागिन्यांनी सजवली. अशा प्रकारे तिने पुलवामा हल्ल्यातील शहिदांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शहीद स्मारक साकारून आपली श्रद्धांजली अर्पण केली आहे.वडिलांपासून मिळाली प्रेरणागायत्री घुसे हिचे वडील मूर्तिकार आहेत. लहानपणापासून वडील साकारत असलेल्या कलाकृती गायत्री पाहते. यातूनच तिला कलाकृती तयार करण्याची आवड निर्माण झाली. दोन वर्षांपूर्वी १५ ऑगस्टला गायत्रीने नारळाच्या १५१ फुलांचा वापर करून तिरंग्याची कलाकृती साकारली होती.‘लोकमत’ला देणार शहीद स्मारकलोकमत सर्व विषयांच्या स्पष्ट आणि विस्तृत बातम्या प्रकाशित करते. ‘लोकमत’ मुळे राज्यातील, देशातील घडामोडी घरबसल्या कळतात. त्यामुळे शहीद स्मारकाची तयार केलेली कलाकृती ‘लोकमत’ला भेट देण्याचा निर्णय गायत्री आणि तिचे वडील अभय घुसे यांनी घेतला आहे.

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्ला