शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

शहीद जवान नरेश बडोले यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 16:28 IST

शहीद जवान नरेश उमराव बडोले यांच्या पार्थिवावर शुक्रवारी डिगडोह स्मशानभूमी येथे शासकीय इतमामात अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: शहीद जवान नरेश उमराव बडोले यांच्या पार्थिवावर शुक्रवारी डिगडोह स्मशानभूमी येथे शासकीय इतमामात अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. जम्मू काश्मीर मधील बडगाम जिल्ह्यातील चाडूरा भागातील बडीपूरा येथे 24 सप्टेंबर 2020 रोजी सकाळी झालेल्या अतिरेक्यांच्या हल्ल्यात येथील जवान बडोले शहीद झाले आहेत.

शहीद जवान बडोले यांच्या पार्थिवाला त्यांच्या मुली मृणाल (22) तसेच प्रज्ञा (20) यांनी भडाग्नी दिला. तत्पूर्वी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या वतीने बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना देत शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवाला सलामी देण्यात आली. यावेळी त्यांच्या पत्नी श्रीमती प्रमिला नरेश बडोले (44) आप्त परिवार व सर्व स्तरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.खासदार कृपाल तुमाने, आमदार समीर मेघे, पोलीस महानिरीक्षक संजय लाटकर, उपमहानिरीक्षक संजय कुमार, केंद्रीय राखीव पोलीस दलाचे कमांडंट सुभाष चंद्र, करुणा राय, मुख्य चिकित्सा अधिकारी डॉ. अलेक्स पी. टी., पोलीस उपायुक्त विक्रम साळी, विवेक मसाळ, एमआयडीसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंत कुमार खराबे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर शिल्पा खरपकर, ग्रामीण उप विभागीय अधिकारी इंदिरा चौधरी, हिंगण्याचे सभापती बबनराव आवडे, तहसिलदार संतोष खंडरे, कल्याण संघटक सत्येंद्र चौरे, सरपंच इंद्रायणी कारबाने आदींनी यावेळी पुष्पचक्र अर्पण करुन श्रद्धांजली वाहिली.गृहमंत्र्यांनी अर्पण केले पुष्पचक्रगृहमंत्री अनिल देशमुख यांनी बडोले यांच्या निवासस्थानी जावून कुटुंबाची सांत्वना केली. शहीदाच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले. नागपूरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनीही आपल्या संवेदना व्यक्त केल्या आहेत. जिल्हा प्रशासनाच्या वतीने अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत फडके, निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र खजांजी यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

टॅग्स :Deathमृत्यू