शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
3
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
4
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
5
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
6
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
7
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
8
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
9
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
10
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
11
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
12
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
13
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
14
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
15
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
16
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
17
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
18
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
19
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
20
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?

शहीद भूषण सतई यांना काटोलवासियांनी दिला अखेरचा निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2020 14:52 IST

Nagpur News martyr जमू काश्मीर मधील गुजर सेक्टर मध्ये पाकिस्तान सैनिकांनी शुक्रवारी सिझ फायरचे उल्लंघन करून केलेल्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या सैनिकांत काटोल येथील सैनिक भूषण सतईचे पार्थिव सोमवार सकाळी 10.25 ला त्याच्या फैलपुरा येथील घरी पोहचले.

ठळक मुद्देशहीद जवान भूषण सतईवर लष्करी इतमामात मानवंदनाब्रिगेड ऑफ गार्ड रेजिमेंटच्या परेड ग्राऊंडवर गार्ड ऑफ ऑनर राज्य शासनातर्फे पालकमंत्र्यांनी वाहिली श्रध्दांजली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर :  जम्मू काश्मीरमध्ये शहीद झालेले काटोलचे सुपुत्र शहीद नायक भूषण सतई यांना कामठी येथील ब्रिगेड ऑफ गार्ड रेजिमेंटच्या गरुडा परेड ग्राऊंडवर अखेरची मानवंदना देण्यात आली.    राज्य शासनातर्फे राज्याचे उर्जामंत्री तथा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी शहीद भूषण सतई यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करुन श्रध्दांजली अर्पण केली. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले. शहीद भूषण सतई हे मुळचे काटोलचे असून त्यांच्यावर  लष्करी इतमामात काटोल नगरीत अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत.    उत्तर महाराष्ट्र व गुजरात राज्याच्या सैन्य विभागाच्या सब एरियाचे प्रमुख मेजर जनरल दिनेश हुड्डा यांनी अभिवादन केले. सैन्यदलाच्या विशेष पथकाकडून पारंपारिक  धुन वाजवून व सशस्त्र दलातर्फे यावेळी गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. सेनादलाचे वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी यांनी वीरपुत्राला श्रध्दांजली वाहिली.    यावेळी ब्रिगेडीयर संदीप कुमार, ब्रिगेडीयर दिपक शर्मा, कमांडर श्रीमती मनिषा काठे, कमांडर अलोक बेरी, आर. बी. बिराजदार यांचेसह जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे जिल्हा पोलीस अधिक्षक राकेश ओला, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉ. शिल्पा खरपकर आदीनी पुष्पचक्र अर्पण केले.    काश्मिर खोऱ्यातील गुरेज सेक्टरमध्ये मागील शुक्रवारी पाकिस्तानने केलेल्या हल्यात भारतीय लष्काराचे चार जवान शहीद झाले होते. यामध्ये काटोल येथील भूषण रमेश सतई यांना वीरमरण आले. कामठी येथील लष्करी हॉस्पिटलमधून शहीदाचे पार्थिव सेनादलाच्या गरुडा परेड येथील अमर योध्दा स्मारकाजवळ ठेवण्यात आले. यावेळी सेनादलाकडून मानवंदना देण्यात आली. त्यानंतर वीर सुपुत्राचे पार्थिव त्यांच्या मुळगावी काटोल येथे संपूर्ण सन्मानपूर्वक रवाना झाले यावेळी शहीद सुपुत्राचे निकटवर्तिय उपस्थित होते.

नागरिकांसह घरच्यांनी शहीद जवानाला मानवंदना दिली. या क्षणी उपस्थित्यांचे मन गहिवरून आल्याचे चित्र दिसत होते. नागरिकांनी शहीद भूषण अमर राहे व भारत माता की जयच्या घोषणा दिल्या. चिडलेल्या नागरिकांनी पाकिस्तान विरुध्द निषेधही नोंदविला. हजारो नागरिकांच्या उपस्थितीत काटोल शहरातील मुख्य रस्त्यांनी त्याचे पार्थिव घेऊन अंत्ययात्रा काढण्यात आली. यात आबालवृद्धांचा व महिला भगिनींचा समावेश होता.

टॅग्स :Martyrशहीद