शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

कोकेन तस्कर विमानतळावर जेरबंद

By admin | Updated: May 20, 2017 02:53 IST

कोकेनची खेप घेऊन मुंबईहून विमानाने नागपुरात आलेल्या एका तस्कराला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली.

मुंबईहून आला नागपुरात : हैदराबादला पोहचणार होती खेप लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोकेनची खेप घेऊन मुंबईहून विमानाने नागपुरात आलेल्या एका तस्कराला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. शुक्रवारी सायंकाळी ६ ते ६.३० च्या सुमारास झालेल्या या कारवाईमुळे विमानतळ परिसरात खळबळ निर्माण झाली होती. सत्यप्रकाश उर्फ सर्वेश मिश्रा (वय ३०) असे पोलिसांनी अटक केलेल्या तस्कराचे नाव आहे. तो मुंबईतील रहिवासी आहे. तो कोकेनची खेप घेऊन एक तस्कर इंडिगो फ्लाईट क्रमांक ४०३ ने मुंबईहून नागपूरकडे निघाला आहे. तो काळी टी शर्ट घालून आहे आणि २८ क्रमांकाच्या सीटवर बसला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्टीय विमानतळावर पोहचलेला हा तस्कर येथून परप्रांतात जाणार असल्याची माहितीही गुन्हे शाखेचे उपायुक्त संभाजी कदम यांना मिळाली. त्यावरून कदम यांनी गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाला सायंकाळी ६ च्या सुमारास नागपूर विमानतळावर पाठविले. या पथकाने बारकाईने पाहणी केल्यानंतर संशयास्पद अवस्थेत असलेल्या मिश्राला ताब्यात घेतले. त्याची तपासणी केली असता त्याच्याजवळ कोकेन आढळले. त्यामुळे त्याला ताब्यात घेतले. या कारवाईमुळे विमानतळ परिसरात खळबळ निर्माण झाली. मिश्राला ताब्यात घेतल्यानंतर विमानतळावरून गुन्हे शाखेत नेण्यात आले. तेथे त्याची वृत्तलिहिस्तोवर चौकशी सुरू होती. यासंदर्भात विचारणा केली असता, आरोपी मिश्रा हा ५.३० च्या विमानाने नागपुरात आला. येथून तो विमानाने हैदराबाद येथे जाणार असल्याचे आतापर्यंतच्या चौकशीत पुढे आले असून, त्याबाबत अधिक चौकशी सुरू असल्याचे उपायुक्त कदम यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. अनेक ग्राहकांची नावे उघड दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या कोकेन तस्कराने नागपूर आणि हैदरबाद येथील अनेक कोकेन शौकिनांची नावे पोलिसांना सांगितल्याचे समजते. हे सर्व कोकेन शौकीन ग्राहक हायप्रोफाईल असून, यात काही बुकींचाही समावेश आहे. विशेष म्हणजे, १५ दिवसांपूर्वी सर्वेशने नागपुरात एक मोठी कोकेन खेप आणली होती, अशीही माहिती तपासात पुढे आली आहे.