शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
4
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
5
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
6
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
7
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
8
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
9
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
10
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
11
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
12
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
13
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
14
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
15
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
16
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
17
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
18
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
19
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
20
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय स्तरावर खेळलेल्या महिला कब्बडीपटूला नोकरी देतो सांगून केले लग्न; त्याच्या त्रासाला कंटाळून संपवले जीवन

By मंगेश व्यवहारे | Updated: December 12, 2025 16:44 IST

कीटकनाशक प्राशन करून संपविले जीवन : माळेगाव टाऊन येथील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कसावनेर : आर्थिक परिस्थिती हलाखीची, शिक्षण घेऊनही हाताला काम नाही, त्यातच तरुणाने तिला नोकरी मिळवून देण्यासाठी लग्न करण्याचा प्रस्ताव ठेवला. नोकरी मिळेल या आशेपोटी महिला कबड्डीपटूने त्याच्याशी लग्न तर केले, मात्र काही दिवसांनी आपण लग्न करून फसल्याचे तिच्या लक्षात आले. त्यातच त्याचा मानसिक त्रासही वाढला. हा मनस्ताप असह्य झाल्याने अखेर तिने कीटकनाशक प्राशन करून जीवन संपविले. ही घटना सावनेर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील माळेगाव (टाऊन) येथे रविवारी (दि. ७) घडली.

किरण सूरज दाढे (वय २९, रा. माळेगाव टाऊन, ता. सावनेर) असे मृत महिला कबड्डीपटूचे, तर स्वप्निल जयदेव लांबघरे (३०, रा. पटकाखेडी, ता. सावनेर) असे फरार आरोपीचे नाव आहे. किरणने सावनेर शहरातील डॉ. हरिभाऊ आदमने महाविद्यालयात बीएपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. विद्यार्थिदशेत तिने विद्यापीठासोबत राज्य व राष्ट्रीय स्तरावर मैदान गाजविले. उत्कृष्ट कबड्डीपटू असल्याने आपल्याला नोकरी मिळावी, अशी अपेक्षा असल्याने तिने सैन्य दलासोबत पोलिस, होमगार्ड, डिफेन्ससह अन्य विभागांत नोकरीसाठी सतत प्रयत्न केले. नोकरी मिळण्यात यश येत नसल्याने तसेच घरातील आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने तिने सावनेरातील डॉ. अनुज जैन यांच्या डेंटल क्लिनिकमध्ये, तर तिच्या धाकट्या भावाने मोबाइल शॉपीमध्ये कामाला सुरुवात केली.

पुढे त्याचा त्रास वाढल्याने तिने त्याचे मोबाइलमधील सर्व मॅसेज जतन करून ठेवत गुरुवारी (दि. ४) सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास कीटकनाशक प्राशन केले. हा प्रकार लक्षात येताच कुटुंबीयांनी तिला सावनेर येथील शासकीय रुग्णालयात नेले. प्रथमोपचार केल्यानंतर तिला नागपूर शहरातील मेडिकल हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. तिथे उपचारादरम्यान रविवारी मृत्यू झाला. याप्रकरणी सावनेर पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता (बीएनएस) कलम १०८ अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे. या घटनेचा तपास पोलिस उपनिरीक्षक दीपक निंबाळकर करीत आहेत.

संबंध ठेवण्यासाठी दबाव

लग्नानंतर स्वप्निल तिला व तिच्या भावाला नोकरी लावून देण्यासाठी टाळाटाळ करू लागला. सोबतच संबंध ठेवण्यासाठी तो दबाव आणत होता. संबंधासाठी आई-वडिलांना नकार दिल्यास घटस्फोट देण्याची धमकीही त्याने तिला दिली होती. तिला अडवून त्रास देणे, फोनवर शिवीगाळ करणे असे प्रकार त्याने सुरू केल्याने तिने घटस्फोट घेण्यासाठी कुटुंब न्यायालयात प्रकरण दाखल केले होते. तरीही त्याचे तिला त्रास देणे सुरूच होते.

लग्नानंतरही माहेरीच राहायची

याच काळात तिची स्वप्निलसोबत ओळख झाली. त्याने तिच्या अगतिकतेचा फायदा घेत त्याची शेती वेकोलिने अधिग्रहित केल्याने त्या शेतीच्या आधारे तिला व तिच्या भावाला वेकोलित नोकरी लावून देण्याची बतावणी केली.त्यासाठी आपल्यात नातेसंबंध असणे आवश्यक असल्याचे सांगून त्याने तिला लग्न करण्याची सूचना केली. तिने विश्वास ठेवत दि. १० जुलै २०२० रोजी त्याच्याशी नोंदणी पद्धतीने लग्न केले. काही दिवसांनी तिच्या कुटुंबीयांना या लग्नाबाबत कळले. मात्र, ती लग्नानंतरही माहेरीच राहायची. 

English
हिंदी सारांश
Web Title : National-level Kabaddi Player Ends Life After Marital Abuse Over Job Promise

Web Summary : A national-level Kabaddi player committed suicide after facing harassment from her husband, who married her promising a job. He failed to deliver, pressured her, and she filed for divorce before tragically ending her life.
टॅग्स :nagpurनागपूरCrime Newsगुन्हेगारी