शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
3
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
4
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
5
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
6
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
7
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
8
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
9
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
10
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
11
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
12
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
13
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
14
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
15
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
16
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
17
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
18
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
19
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
20
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...

नागपुरात हुंड्यासाठी मोडले लग्न : व्यापाऱ्यासह तिघांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 23:22 IST

हुंड्यासाठी लग्न मोडणाऱ्या एका व्यापारी व त्याच्या कुटुंबीयाच्या विरोधात गणेशपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपींमध्ये आकाश वाट, त्याची आई संध्या वाट, बहीण मेघा कारेमोरे, जावई नरेंद्र कारेमोरे यांचा समावेश आहे.

ठळक मुद्देइंजिनीअर युवतीची पोलीस ठाण्यात धाव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हुंड्यासाठी लग्न मोडणाऱ्या एका व्यापारी व त्याच्या कुटुंबीयाच्या विरोधात गणेशपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपींमध्ये आकाश वाट, त्याची आई संध्या वाट, बहीण मेघा कारेमोरे, जावई नरेंद्र कारेमोरे यांचा समावेश आहे.तक्रारकर्ती युवती गणेशपेठ येथील रहिवासी असून, ती इंजिनीअर आहे. युवतीच्या कुटुंबीयांनी एका नातेवाईकाच्या माध्यमातून मे २०१७ मध्ये आकाश याच्या घरच्याशी संपर्क केला. दोन्ही कुटुंबाच्या चर्चेनंतर लग्न ठरले. युवतीचे वडील टेलरचे काम करतात. तिच्या कुटुंबात आई-वडिलांबरोबरच लहान भाऊसुद्धा आहे. मध्यमवर्गीय कुटुंब असल्याने त्यांनी आपल्या क्षमतेनुसार लग्नात खर्च करणार असल्याचे सांगितले. आकाश याचा पाईप बनविण्याचा छोटा व्यवसाय आहे. जून महिन्यात आकाशचे युवतीसोबत साक्षगंधही झाले. युवतीच्या तक्रारीनुसार साक्षगंधाच्या वेळी आकाशच्या कुटुंबीयांनी १९ नोव्हेंबरला लग्नाची तिथी ठरविली होती. त्यामुळे युवतीच्या वडिलांनी मंगल कार्यालय बुक केले होते. लग्नासाठी कपडे व दागिन्यांचीसुद्धा खरेदी केली होती. लग्नपत्रिकाही वाटल्या होत्या.याच दरम्यान आकाशने व्यवसायाच्या नावाखाली १० लाख रुपयांची मागणी केली. युवतीने त्याला समजविण्याचा प्रयत्न केला. घरची परिस्थिती सांगितली. वडिलांच्या आजारात मोठा खर्च झाल्याचेही सांगितले. त्यामुळे एवढी मोठी रक्कम देणे शक्य नसल्याचे युवतीने सांगितले. पैसे देण्यास नकार दिल्यामुळे आकाश व त्याचे कुटुंबीय लग्नास टाळाटाळ करू लागले. तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन बदनाम करू लागले. त्यांनी लग्नासही नकार दिला होता.तोपर्यंत युवतीच्या कुटुंबीयांनी लग्नासाठी ४ लाख २१ हजार रुपये खर्च केले होते. त्यांनी आकाश व त्याच्या कुटुंबीयांना समजविण्याचा प्रयत्नही केला होता. परंतु आकाशने नोव्हेंबर २०१७ मध्ये दुसऱ्या मुलीशी साक्षगंधही करून घेतले होते. ही माहिती पीडित युवती व तिच्या कुटुंबीयांना मिळाल्यामुळे ते संतप्त झाले. युवतीने एक महिन्यापूर्वी गणेशपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलीस उपनिरीक्षक कांडेकर यांनी तपासानंतर आरोपींच्या विरोधात फसवणूक व हुंडा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :dowry probition actहुंडा प्रतिबंधक कायदाNagpur Policeनागपूर पोलीस