शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

पाडव्याच्या खरेदीचा बाजारात गोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 10:53 IST

साडेतीन मुहूर्तापैकी एक समजल्या जाणाऱ्या गुढीपाडव्याला वस्तू खरेदीसाठी ग्राहकांमध्ये उत्साह आहे. यावर्षी इलेक्ट्रॉनिक्स आणि दुचाकी, चारचाकी वाहनांच्या खरेदीवर ग्राहकांचा भर दिसून येत आहे.

ठळक मुद्देग्राहकांमध्ये उत्साह कोट्यवधींची होणार उलाढाल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : साडेतीन मुहूर्तापैकी एक समजल्या जाणाऱ्या गुढीपाडव्याला वस्तू खरेदीसाठी ग्राहकांमध्ये उत्साह आहे. यावर्षी इलेक्ट्रॉनिक्स आणि दुचाकी, चारचाकी वाहनांच्या खरेदीवर ग्राहकांचा भर दिसून येत आहे. ६ एप्रिलला गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तासाठी दुकानदार सज्ज आहेत. बिल्डर्स नवीन प्रकल्पांचे उद्घाटन या शुभमुहूर्तावर करणार आहेत. जीएसटीत सवलत असल्यामुळे घर खरेदीकडे ग्राहकांचा कल आहे.इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या शोरूमध्ये नामांकित कंपन्यांच्या विविध उत्पादनांवर आॅफर आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नामांकित कंपन्या आणि दुकानदारांनी जाहिराती दिल्या आहेत. विविध वस्तूंच्या खरेदीवर आर्थिक सवलत आणि कॅशबॅकची आॅफर आहे. याशिवाय एकावर दुसरे उत्पादन मोफत देण्यात येत आहेत. एलएडी, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, लॅपटॉप, मोबाईलसह विविध वस्तूंकडे ग्राहकांचा कल आहे. सर्व वस्तू फायनान्सवर ग्राहकांना खरेदीची संधी असून ग्राहकांमध्ये उत्साह असल्याचे श्रीकांत इलेक्ट्रॉनिक्सचे श्रीकांत भांडारकर यांनी सांगितले. शहरात ३०० पेक्षा जास्त शोरूममध्ये २५ कोटींची उलाढाल होण्याची अपेक्षा आहे. पूर्वीच बुकिंग केलेल्या दुचाकी आणि चारचाकी गाड्या गुढीपाडव्याला घरी नेण्याची प्रथा आहे. दुचाकी कंपन्यांमध्ये होंडा, हिरो, टीव्हीएस, महिंद्र, यामाहा, सुझुकी आणि विविध इलेक्ट्रिक कंपन्यांचा समावेश आहे. यादिवशी चार हजारांपेक्षा जास्त दुचाकीची विक्री होणार आहे. मारुती सुझुकी, होंडा, ह्युंडई, टोयोटा, टाटा या कंपन्यांच्या गाड्यांना मागणी आहे. तसेच लक्झरियस कारमध्ये मर्सिडिज, बीएमडब्ल्यू, आॅडी, स्कोडा या गाड्यांकडे ओढा दिसून येत आहे. सर्व वाहनांचे बुकिंग आधीच झाले आहे. या दिवशी जवळपास एक हजार चारचाकींची विक्री होण्याची शक्यता आहे.

सोन्याचे दागिने व चांदीच्या वस्तूंना मागणीगुढीपाडव्याला किमान एक ग्रॅम सोने खरेदीची प्रथा आहे. शुक्रवारी शुद्ध दहा ग्रॅम सोन्याचे दर ३२,८९० रुपयांवर पोहोचल्यानंतरही ग्राहकांमध्ये उत्साह आहे. नामांकित सराफा शोरूममध्ये चांदीची गुढी विक्रीस असून दरवर्षी मागणी वाढत असल्याचे सराफांनी सांगितले. याशिवाय बाजारात प्रचलित एक आणि दोन ग्रॅमच्या दागिन्यांची मागणी वाढत आहे. तसेच पूर्वीच आॅर्डर केलेले दागिने ग्राहक गुढीपाडव्याला घरी नेणार आहे. लग्नसराईच्या दागिन्यांची आॅर्डर ग्राहकांनी पूर्वीच दिलेली आहे. सर्वच शोरूमच्या संचालकांनी आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचा संग्रह केला आहे. यादिवशी सोने आणि चांदीच्या नाण्यांना मागणी असते. गुढीपाडव्याला सराफा बाजारात ४० कोटींची उलाढाल होण्याची शक्यता सराफांनी व्यक्त केली.

टॅग्स :gudhi padwaगुढीपाडवा