ढिसाळ गोलंदाजी, तीन झेलही सोडले
भारतीय गोलंदाजांना आज खेळपट्टीपासून काहीच लाभ मिळाला नाही. खेळाडूंनी क्षेत्ररक्षणात वारंवार चुका केल्याने अनावश्यक धावा मोजल्या. यादरम्यान तीन झेल सोडल्याचा मोठा फटका बसला. आयपीएलमध्ये धोकादायक वाटणारे सर्वच गोलंदाज थकलेले जाणवले. यजमान फलंदाजांना त्यांचा सामना करताना कुठलाही त्रास जाणवला नाही.