शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
6
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
7
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
8
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
9
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
10
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
11
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
12
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
13
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
14
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
15
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
16
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
17
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
18
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
19
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
20
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस

सरकारी कार्यालयात मार्च एण्डिंगची धावपळ

By admin | Updated: April 1, 2015 02:34 IST

आर्थिक वर्ष संपण्याच्या अखेरच्या दिवशी ३१ मार्चला कोषागार कार्यालयात देयके सादर करण्यासाठी विविध विभागाच्या कर्मचाऱ्यांनी एकच गर्दी केली होती.

नागपूर : आर्थिक वर्ष संपण्याच्या अखेरच्या दिवशी ३१ मार्चला कोषागार कार्यालयात देयके सादर करण्यासाठी विविध विभागाच्या कर्मचाऱ्यांनी एकच गर्दी केली होती. रात्री ८वाजेपर्यंत नागपूर कोषागार कार्यालयात १३७७ देयक (२९४ कोटी५३ लाख रुपयांची) प्राप्त झाली होती. जिल्हा नियोजन कार्यालयासह इतरही विभागात मंगळवारी मार्च ‘एण्डिंग’ची धावपळ दिसून आली.अर्थसंकल्पीय निधी दर महिन्याला थेट आॅनलाईन स्थानांतरित होत असल्याने पूर्वीसारखी आता स्थिती उरली नसली तरीही दरवर्षी ३१ मार्चला कोषागार कार्यालयात देयकं सादर करण्यासाठी झुंंबड उडतेच. यंदाही ३० मार्चपासून या कार्यालयात हीच स्थिती आहे. एरवीपेक्षा या दोन दिवसात कार्यालयाकडे सादर होणाऱ्या देयकांच्या संख्येत तिपटीने वाढ झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. मंगळवारी दोन ते अडीच हजार देयक सादर झाली. देयके सादर करण्यासाठी कार्यालयात गर्दी झाली होती. सायंकाळी ७ वाजेपर्यंत देयक स्वीकारण्याची मुदत होती. नेमका आकडा विचारण्यासाठी उपजिल्हा कोषागार अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी काहीही माहिती देण्यास नकार दिला. मुख्य कोषागार अधिकाऱ्यांच्या भेटीची परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे तपशील कळू शकला नाही. जिल्हाधिकारी कार्यालयाची पाच कोटींची देयके मंजूर झाली. जिल्हा नियोजन विभागानेही चार कोटीच्या देयकांना मंजुरी दिली. उत्पादन शुल्क विभागातही आज प्रचंड गर्दी होती. (प्रतिनिधी)