शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
2
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
3
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
4
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
5
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
6
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
7
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
8
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
9
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
10
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
11
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
12
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
13
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
14
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
15
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
16
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
17
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
18
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
19
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
20
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video

मॅरेथॉनमध्ये शुभम, राजश्री, नंदू, गीता विजेते

By admin | Updated: April 15, 2017 02:22 IST

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंतीदिनी आयोजित मॅरेथॉन दौड स्पर्धेत शुभम मेश्राम, राजश्री पद्मगीरवार,

नागपूर : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंतीदिनी आयोजित मॅरेथॉन दौड स्पर्धेत शुभम मेश्राम, राजश्री पद्मगीरवार,नंदू भुजाडे आणि गीता चाचेरकर यांनी विजेतेपदाचा मान मिळविला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मॅरेथॉन दौड समितीतर्फे नागपूर जिल्हा अ‍ॅथ्लेटिक्स संघटनेच्या सहकार्याने संविधान चौक ते दीक्षाभूमी असे आयोजन करण्यात आले. खुल्या गटात पुरुषांची ११ किमी दौड शुभम मेश्रामने ३५ मिनिटे ४५.०५ सेकंदात जिंकली. शेषराज राऊत दुसऱ्या तर विक्की राऊत तिसऱ्या स्थानी राहिला. महिलांची ८ किमी दौड राजश्री पद्मगीरवारने २८ मिनिटे ३२.४५ सेकंदात पूर्ण करीत अव्वल स्थान मिळविले. प्रणाली बोरेकर दुसऱ्या आणि कोमल ढबाले तिसऱ्या स्थानी आली. १८ वर्षांखालील मुलांच्या ८ किमी दौडमध्ये नंदू भुजाडे २७ मिनिटे ३५.१५ सेकंदांसह अव्वल आला. रोहित झा व अभय गोरे दुसऱ्या तसेच तिसऱ्या स्थानी राहिले. मुलींची ४ किमी दौड गीता चाचेरकरने १७ मिनिटे ३५.५३ सेकंदात पूर्ण केली. दिव्या नखाते व खुशी बुधकोंडावार यांना दुसऱ्या तसेच तिसऱ्या स्थानी समाधान मानावे लागले. स्पर्धेला आ. डॉ. मिलिंद माने यांनी हिरवा झेंडा दाखविला. दीक्षाभूमी येथे पुरस्कार वितरण सोहळ्याला समितीचे अध्यक्ष यशवंत तेलंग, योगेश ठाकरे, जिल्हा अ‍ॅथलेटिक्स संघटनेचे सचिव डॉ. शरद सूर्यवंशी, गुरुदेव नगराळे, रवींंद्र टोंग, डॉ. विवेकानंद सिंग, बंटीप्रसाद यादव, राम वाणी, अर्चना कोट्टेवार उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते चारही गटातील पहिल्या दहा स्थानावरील धावपटूंना पुरस्कार प्रदान करण्यात आले. (क्रीडा प्रतिनिधी) निकाल : पुरुष (११ किलोमीटर) : शुभम मेश्राम ३५ मि.४५.०५ सेकंद, शेषराज राऊत ३७:२०.१२ (दोन्ही नवमहाराष्ट्र क्रीडा मंडळ), विक्की राऊत ३८:१२.१५ (नागपूर सिटी अ‍ॅथ्लेटिक्स क्लब), कमलेश रंगारी (नवमहाराष्ट्र क्रीडा मंडळ), नीलेश हटवार (ट्रॅक स्टार अ‍ॅथलेटिक्स क्लब), भास्कर अतकरे (प्रो-हेल्थ फाऊंडेशन), नंदकिशोर आकार (एस.बी. सिटी कॉलेज), सूरज तिवारी (ट्रॅक स्टार अ‍ॅथ्लेटिक्स क्लब), नीतेश बिसेन (नागपूर सिटी अ‍ॅथ्लेटिक्स क्लब), निशांत रामटेके (विद्यार्थी युवक क्रीडा मंडळ). महिला ( ८ किलोमीटर) : राजश्री पद्मगीरवार २८ मि. ३२.४५ से. (नवमहाराष्ट्र क्रीडा मंडळ), प्रणाली बोरेकर २९:२०.१५ (ट्रॅक स्टार अ‍ॅथ्लेटिक्स क्लब), कोमल ढबाले ३०:१५.४५ (रॉयल रनर्स क्लब), शारदा भोयर (नागपूर सिटी अ‍ॅथ्लेटिक्स क्लब), अनिता भलावी (ट्रॅक स्टार अ‍ॅथ्लेटिक्स क्लब), अंशू राऊत, नेहा चौधरी (दोन्ही विद्याथी युवक क्रीडा मंडळ), साक्षी डोंगरे (मानवता हायस्कूल). ४१८ वर्षांखालील मुले (८ किलोमीटर) : नंदू भुजाडे २७ मि. ३५.१५ से. (नवमहाराष्ट्र क्रीडा मंडळ), रोहित झा २८:३०.१८,अभय गोरे २९:१२.२५ (दोन्ही प्रो-हेल्थ फाऊंडेशन), प्रणय मोरघडे, प्रफुल्ल निकम (दोन्ही विद्यार्थी युवक क्रीडा मंडळ), अभिषेक ढोमणे (नवमहाराष्ट्र क्रीडा मंडळ), अमन गुप्ता, वैभव सुपटकर, प्रतीक बारापात्रे (ज्योती फिटनेस अकादमी), पवन मोरघडे (विद्यार्थी युवक क्रीडा मंडळ). मुली (४ किलोमीटर) : गीता चाचेरकर, १७ मि. ३५.५३ से., दिव्या नखाते १७:४०.२० (दोन्ही विश्वव्यापी विद्यालय, वेलतूर), साक्षी बुधकोंडावार १८:२०.४५, आस्था निंबार्ते, मानसी निंबार्ते, निधी तरारे (सर्व विद्यार्थी युवक क्रीडा मंडळ), तन्वी मेंढे, मीना देवराई, दिव्यानी डोंगे, मोना डायरे (सर्व ज्योती फिटनेस क्लब).