शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

मराठी रंगभूमी दिन : वैदर्भीय रंगकर्मींच्या एकतेची घोषणा तेव्हाच हवेत विरली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 19:25 IST

रंगकर्मींनी एकत्र यावे, अशी ओरड अनेक वर्षांपासून आहे, तसे उपक्रमही राबविण्यात आले. मात्र, प्रयत्न तोकडे पडल्याने आणि त्यात संबंधितांचाच स्वार्थ अधिक असल्याने, तो ‘सोनियाचा दिनू’ कधीच उगवला नाही.

ठळक मुद्देपृथक विदर्भासाठी एकवटले होते नाट्यकर्मी, आता आंदोलनाचाच झाला बट्ट्याबोळ१२ जून २०१४ रोजी पहिला आणि अखेरचा ‘नाट्य कलावंतांचा मेळावा’

प्रवीण खापरे / लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रंगकर्मींनी एकत्र यावे, अशी ओरड अनेक वर्षांपासून आहे, तसे उपक्रमही राबविण्यात आले. मात्र, प्रयत्न तोकडे पडल्याने आणि त्यात संबंधितांचाच स्वार्थ अधिक असल्याने, तो ‘सोनियाचा दिनू’ कधीच उगवला नाही. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पाच वर्षापूर्वी असे प्रयत्न एका विदर्भवादी संघटनेने केले होते. मात्र, निवडणूक आटोपताच त्यांना रंगकर्मींचा विसर पडला आणि वैदर्भीय रंगकर्मींच्या एकतेची घोषणा तेव्हाच हवेत विरली. मराठी रंगभूमी दिनाच्या पार्श्वभूमीवर, असे प्रयत्न पुन्हा होतील का आणि त्याला रंगकर्मी दाद देईल का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.कोणत्याही आंदोलनाला बळकटी देण्यासाठी, त्यातील प्रत्येक घटकांना न्याय देणे गरजेचे असते. कलावंतांना हाताशी धरले तर त्याचा प्रभाव सकारात्मक होईल, असा मानस २०१४ मध्ये ‘जनमंच’ या विदर्भवादी स्वयंसेवी संस्थेचा झाला. त्याअनुषंगाने त्यावेळेसच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर २२ जून २०१४ रोजी नागपुरात काँग्रेसनगर येथील एका कार्यकर्त्याच्या घरी प्रथमच ‘वैदर्भीय नाट्य कलावंतांचा मेळावा’ भरविण्यात आला होता. रंगकर्मींचा आवाज मोठा असल्याने, विखुरलेल्या रंगकर्मींना एकत्र आणायचे आणि पृथक विदर्भाच्या आंदोलनाला बळकटी द्यायची, असा तो हेतू होता. यासाठी संपूर्ण विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून रंगकर्मी उपस्थितही झाले. आंदोलनाच्या अनुषंगाने दरवर्षी असा मेळावा जिल्हास्तरावर घ्यायचा आणि नागपुरात भव्य सोहळा करायाचा, अशी घोषणाही त्यावेळी करण्यात आली होती. मात्र, रंगकर्मींच्या विकासासाठी आणि त्यांच्या उपक्रमांना वाव देण्याची कोणतीही घोषणा झाली नव्हती. मनस्वी कलावंतांना ही बाब रुचणारी नव्हती. मिळेल त्या मार्गाने आपला उदरनिर्वाह सांभाळत, कलेसाठी संपूर्ण आयुष्य खर्ची घालणाऱ्या कलावंतांना विदर्भवाद्यांचा हा स्वार्थ कळला आणि तो गेली पाच वर्षे प्रकर्षाने दिसूनही आला. त्याचेच कारण म्हणून या मेळाव्यात घोषणा करूनही, त्यानंतर कधीच असला मेळावा आयोजित झाला नाही किंवा साधा उल्लेखही करणे टाळले गेले. आतापर्यंत इतर राजकीय पक्ष कलावंतांकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत होते.त्यात विदर्भवाद्यांचीही भर पडल्याने, रंगकर्मींचा हिरमोड झाल्याचे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे, रंगकर्मींना स्वार्थासाठी एकत्र आणण्याचा प्रयत्न करू पाहणारे विदर्भवादी आता स्वत:च विखुरलेले असल्याचे दिसून येत आहे.वैदर्भीय रंगपीठ निर्माण होईल का?याच मेळाव्यात वैदर्भीय रंगकर्मींसाठी ‘वैदर्भीय रंगपीठ’ उभारण्याची घोषणा झाली होती. मात्र, संवाद माध्यमात अतिशय निष्णात असलेल्या जनमंच आणि रंगकर्मीतर्फे त्यासाठी कधीच प्रयत्न झालेले नाही. नाट्य अभिव्यक्तीतून इतरांना प्रबोधनाचे डोस पाजणारा रंगकर्मी संवादाचा वापर केवळ हेवेदाव्यासाठी करण्यातच व्यस्त आहे. तर, वेगळ्या विदर्भासाठी आंदोलन उगारणाऱ्या जनमंचचा प्रभाव ओसरल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे, वैदर्भीय रंगपीठासाठी आता कोण पुढाकार घेईल, असा प्रश्न मराठी रंगभूमी दिनाच्या पार्श्वभूमीवर उपस्थित होत आहे.

 

टॅग्स :marathiमराठीNatakनाटकTheatreनाटक