शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

मराठीला निस्सीम आपलेपणाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 12:09 IST

मराठी भाषेला आज समाजाच्या निस्सीम आपलेपणाची गरज आहे, असे मत साहित्यिक व संतसाहित्याचे अभ्यासक विवेक घळसासी यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देविवेक घळसासी यांचे प्रतिपादनवि.भि. उपाख्य भाऊसाहेब कोलते मराठी व्याख्यानमाला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मराठी संस्कृतीला टिकवण्याचे कार्य मध्ययुगीन काळात मराठी संतांनी केले. मराठी भाषेला टिकवून ठेवणे म्हणजे मराठी संस्कृतीला टिकवून ठेवणे होय. ही मराठी संस्कृती टिकवून ठेवायची असेल तर मराठी संबंधीचा, पर्यायाने मराठी संस्कृतीसंबंधीचा आग्रह आपण जपला पाहिजे. आणि या आग्रहामागे मराठीसंबंधीची आंतरिक निष्ठा असली पाहिजे. मराठी भाषेला आज समाजाच्या निस्सीम आपलेपणाची गरज आहे, असे मत साहित्यिक व संतसाहित्याचे अभ्यासक विवेक घळसासी यांनी व्यक्त केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर मराठी विभागातर्फे डॉ.वि.भि.उपाख्य भाऊसाहेब कोलते मराठी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ‘मराठी भाषेचे संवर्धन : दिशा आणि परिणाम’ या विषयावर त्यांनी पुष्प गुंफले.मराठी विभागात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विभागप्रमुख डॉ. शैलेंद्र लेंडे हे होते. आजच्या कालखंडात मराठी भाषेच्या अस्तित्वासंबंधी विविध प्रकारचे प्रश्न समाजामध्ये पहावयास मिळतात. मराठी भाषेचे संवर्धन करायचे असेल तर उत्सवी प्रकारचे कार्यक्रम व वरपांगी स्वरूपाचे दिखावटी सोहळे पुरेसे नाहीत. त्याऐवजी अगदी घरगुती पातळीवर मराठीपणा कायम ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. मराठी भाषा ही केवळ भाषिक आविष्कारामधून आविष्कृत होत नाही तर ती मराठीपणा कायम ठेवणाऱ्या सण-उत्सवांमधून, सांस्कृतिक चालीरीतींमधून, परंपरेने चालत आलेल्या रूढीसंकेतांमधून देखील अभिव्यक्त होत असते. त्यामुळे आहारविहार, पोशाख-परंपरा, पारंपरिक विधी, सण-उत्सव, नृत्य-संगीत, गीतपरंपरा, संतवचने इत्यादी घटकांमधून मराठी संस्कृती आज टिकवून ठेवण्याची गरज आहे, असेदेखील घळसासी म्हणाले.डॉ.शैलेंद्र लेंडे यांनी मराठीचा इतिहास व संवर्धनासाठी झालेले आजवरचे प्रयत्न यावर भाष्य केले. डॉ.प्रमोद मुनघाटे यांनी प्रास्ताविक केले. डॉ.अमृता इंदूरकर यांनी संचालन केले तर डॉ.प्रज्ञा निनावे यांनी आभार मानले.

टॅग्स :marathiमराठी