शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

मराठीची चळवळ राजकीय दृष्टीने अदखलपात्र : दीपक पवारांची खंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 23:07 IST

भाषेसाठी सरकारकडे होणारा पत्रव्यवहार डस्टबीन भरण्याचा प्रकार झाला आहे. त्यामुळे मराठीची चळवळ राजकीय दृष्टीने अदखलपात्रच आहे, अशी खंत मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष व राजकीय विश्लेषक डॉ. दीपक पवार यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देसाहित्य संस्थाही भाषाविषयी उदासीन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मराठी लोकांच्या संघटनांमध्ये ऊर्जा घालविण्यास कुणी तयार नाही. मराठी भाषेसाठी रस्त्यावर माणसे येतील असे ग्लॅमर, वलय आमच्या चळवळीत नाही, त्यामुळे माणसे रस्त्यावर येतील अशी स्थितीही नाही, तशी सक्रियताही नाही. माध्यमांना हवे असलेले व्हिज्युअल अपील मराठीच्या सनदशीर आंदोलनात नसल्याने तेही याकडे गांभीर्याने पाहत नाही. अशा परिस्थितीमध्ये भाषेसाठी सरकारकडे होणारा पत्रव्यवहार डस्टबीन भरण्याचा प्रकार झाला आहे. त्यामुळे मराठीची चळवळ राजकीय दृष्टीने अदखलपात्रच आहे, अशी खंत मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष व राजकीय विश्लेषक डॉ. दीपक पवार यांनी व्यक्त केली.महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडी व राजाराम वाचनालय, धरमपेठ यांच्यावतीने ‘मराठी भाषा चळवळीचे वर्तमान आणि भविष्य’ या विषयावर डॉ. पवार यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. अध्यक्षस्थानी सांस्कृतिक आघाडीचे संयोजक व अ.भा. मराठी साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी हे होते. डॉ. पवार यांनी महाराष्ट्राच्या स्थापनेपासून ते भाषेच्या नावाने शिवसेनेची स्थापना, राजकीय पक्षांची भूमिका आणि वर्तमानातील सोशल मीडियावरील सक्रियता, यावर भाष्य केले. मराठी चळवळीच्या नावाने राजकीय पक्ष उभा राहू शकतो, हे शिवसेनेवरून दिसून आले. पण त्यांनीही शहरी मध्यमवर्गीय व नोकरदारांवर लक्ष केंद्रित केले. आता तर मराठीचा मुद्दा त्यांनी केव्हाच सोडला असून, त्यांची हिंदुत्वाकडे वाटचाल सुरू झाली आहे. त्यांच्यापासून तयार झालेल्या मनसेचीही भूमिका हिंदुत्व वगळता फार वेगळी नाही. दोन्ही पक्ष मराठी माणसांवर भर देणारे आहेत, मराठी भाषेवर नाही. शिवसेनेच्या धडाक्यात डाव्यांनी मराठीच्या मुद्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले. काँग्रेस-राष्ट्रवादीने मराठीसाठी महत्त्वाचे निर्णय घेतले, पण ते लावून धरले नाही. वर्तमान सरकारची मराठीसाठी काही करण्याची तयारी नाही. एकूणच २००९ पेक्षा २०१९ ची परिस्थिती विदारक असल्याची नोंद डॉ. पवार यांनी नमूद केली.त्यांनी मराठी साहित्य संस्थांवरही खरपूस टीका केली. साहित्य संस्थांना साहित्याचे प्रश्न भाषेचे वाटतात. येथे तरुणांना स्थान मिळत नाही. राजकीय संस्थांची प्रशासकीय माणसे हलतात, पण या संस्थांमधील माणसे वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेली असतात. साहित्य संमेलनात गंभीर प्रश्नांवर चर्चा होत नाही. सत्तेला अपेक्षित गोष्टी करण्यावरच भर अधिक असतो. अशा साहित्य संस्थांकडून भाषाविषयक जग बदलेल, हा भाबडा समज आहे.दुसरीकडे सध्याचे ऑनलाईन जग हे आभासी आहे. झेंडा पकडून फोटो टाकणारा स्वत:ला नेता म्हणतो. मग हॅशटॅगची चळवळ सुरू होते व सोशल मीडियावर चालते. यातील एखादाच माणूस मराठीसाठी गंभीरपणे रस्त्यावर यायला तयार होतो. याला व्हर्चुअल किंवा त्रयस्थ सक्रियता म्हणतात. यात भाषेचा काय फायदा होतो, हे सांगणे कठीण आहे. संभ्रमावस्था त्यांच्यात असते आणि शांततेच्या काळात मराठीवादी भूमिका निवडणुकीत कधी धार्मिक होते, तेही कळत नाही. धर्मासमोर भाषेचे राजकारण चालत नाही. या माध्यमाचा साधन म्हणून उपयोग महत्त्वाचा असल्याचे मत त्यांनी मांडले. परिस्थिती उदासीन असली तरी महाराष्ट्रात मराठी भाषेची राजकीय स्थिती सुधारणे शक्य आहे. पोटापाण्याचा प्रश्न सुटलेल्यांनी एकत्रितपणे पूर्णवेळ सक्रियपणे २० वर्षे कार्य केले तरच मराठी राजकीय केंद्रस्थानी येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :marathiमराठी