शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

पाश्चिमात्य प्रभावातून मराठी नाटक अधिक दर्जेदार : संयुक्ता थोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 00:18 IST

जुन्या काळापासून मराठी रंगभूमीवर पाश्चिमात्य नाटकांचा प्रभाव राहिला आहे. १९६० ते ८० च्या दशकातील बहुतेक नाटक पाश्चात्त्याकडून घेतलेली आढळतात. मात्र ती घेताना भारतीय संस्कृतीनुसार लेखन शैली, कला आणि संवादात आवश्यक तो बदल करून प्रेक्षकांसमोर अधिक दर्जेदारपणे सादर केल्याचे मत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ ललित कला विभागाच्या डॉ. संयुक्ता थोरात यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देनाट्य परिषदेच्या नागपूर शाखेतर्फे मुक्तचर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जुन्या काळापासून मराठी रंगभूमीवर पाश्चिमात्य नाटकांचा प्रभाव राहिला आहे. १९६० ते ८० च्या दशकातील बहुतेक नाटक पाश्चात्त्याकडून घेतलेली आढळतात. मात्र ती घेताना भारतीय संस्कृतीनुसार लेखन शैली, कला आणि संवादात आवश्यक तो बदल करून प्रेक्षकांसमोर अधिक दर्जेदारपणे सादर केल्याचे मत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ ललित कला विभागाच्या डॉ. संयुक्ता थोरात यांनी व्यक्त केले.जागतिक रंगभूमी दिनानिमित्त अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नागपूर शाखेतर्फे ‘पाश्चिमात्य रंगभूमीचे बदलते प्रवाह आणि मराठी रंगभूमी’ या विषयावर राजाराम दीक्षित वाचनालय, धरमपेठ येथे मुक्तचर्चेचे आयोजन करण्यात आले. यावेळी वक्ता म्हणून डॉ. थोरात आणि प्रा. शिशिर वर्मा यांनी मनोगत मांडले. संकल्पना नागपूर शाखेचे अध्यक्ष सलीम शेख यांची होती. डॉ. संयुक्ता थोरात यांनी पाश्चात्त्य ‘डॉल्स हाऊस, घोस्ट’ व मराठीतील घराबाहेर, सत्वपरीक्षा अशा नाटकांचा उल्लेख करीत हा प्रभाव अधोरेखित केला. आधुनिक नाटकांचे जनक म्हणून ओळख असलेले हेन्रिक इबसन यांच्या नाटकांनी मराठी रंगभूमीला चांगलेच प्रभावित केले आहे. जुन्या नाटकांप्रमाणे लांबलचक संवाद न ठेवता परिस्थितीनुसार प्रेक्षकांची उत्कंठा वाढविण्याचे कौशल्य त्यांनी साधले होते. विरोध होऊनही स्त्रीस्वातंत्र्यासारखे नवीन विचार त्यांनी मांडले. याशिवाय रशियन नाटककार स्टॅनिसलेव्हिस्कीने दिलेले अभिनयाचे तंत्र आजही स्वीकारले जाते. शेक्सपियरने साऱ्या जगाला भुरळ घातली असताना मराठी रंगभूमी त्या प्रभावापासून दूर राहिली नाही, असे मनोगत त्यांनी मांडले.प्रा. शिशिर वर्मा यांनी १८५० पासून ऐतिहासिक परिस्थितीनुसार पाश्चात्त्य रंगभूमी आणि नाटके कशी बदलत गेली, यावर प्रकाश टाकला. आधी होणारे बदल हे संथ होते. पण यांत्रिकीकरणानंतर जगाच्या परिस्थितीत वेगवान बदल घडत गेले. पुढे साम्राज्यशाही, विविध देशांची आंतरिक स्पर्धा, पहिले व दुसरे महायुद्ध, निसर्गावर आक्रमण अशा गोष्टी झपाट्याने होत गेल्या व त्याचे पडसादरंगभूमीवरही पडले. कलेच्या क्षेत्रातही विज्ञान आणि भावनेचे द्वंद्व निर्माण झाले. धर्माच्या नावाने दाबल्या गेलेला स्त्रीस्वातंत्र्याचा विचार रंगभूमीतून बाहेर येऊ लागला. घडणाऱ्या परिस्थितीनुसार चांगले-वाईट बदल होत गेले, ज्याचा प्रभाव आजही बघायला मिळतो. हा इतिहास जाणून नाटकांची निर्मिती करण्याचे आवाहन प्रा. वर्मा यांनी केले. ज्येष्ठ नाटककार अनिल चणाखेकर, प्रा. सोपानदेव पिसे प्रामुख्याने उपस्थित होते. राजेश काळे यांनी आभार मानले.

 

टॅग्स :Natakनाटकmarathiमराठी