शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षण; मागासवर्ग आयोग करणार सर्वेक्षण, दोन गावे निवडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 01:33 IST

मराठा आरक्षणासंदर्भात राज्य शासन सकारात्मक असल्याचा सत्ताधा-यांकडून शुक्रवारी पुनरुच्चार करण्यात आला. न्यायालयात मराठा आरक्षणासंदर्भातील भूमिका भक्कमपणे मांडता यावी, यासाठी सखोल अभ्यास सुरू आहे.

- योगेश पांडेनागपूर : मराठा आरक्षणासंदर्भात राज्य शासन सकारात्मक असल्याचा सत्ताधा-यांकडून शुक्रवारी पुनरुच्चार करण्यात आला. न्यायालयात मराठा आरक्षणासंदर्भातील भूमिका भक्कमपणे मांडता यावी, यासाठी सखोल अभ्यास सुरू आहे. राज्य मागासवर्ग आयोगाकडून राज्यातील प्रत्येक पंचायत समितीतील दोन गावांचे सर्वेक्षण करण्यात येणार असल्याची माहिती सभागृह नेते चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत दिली. मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात शरद रणपिसे, संजय दत्त, भाई जगताप इत्यादी सदस्यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. हा प्रश्न तसेच उपप्रश्नांची मालिका लांबली व प्रश्नोत्तराचा तास सुमारे पाऊण तास वाढवावा लागला. यादरम्यान विरोधक व सत्ताधारी सदस्यांमध्ये शाब्दिक फैरीदेखील झडल्या. मराठा आरक्षणाची बाब न्यायप्रविष्ट आहे. मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक मागासलेपणाबाबत दस्तऐवज तपासून सखोल अहवाल सादर करण्यासंदर्भात राज्य मागासवर्ग आयोगाला कळविण्यात आले होते. याअंतर्गतच प्रत्येक पंचायत समितीतील दोन गावांचे सर्वेक्षण आयोगाकडून करण्यात येणार असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली. तसेच प्रत्येक जिल्ह्यात अण्णाभाऊ पाटील आर्थिक विकास महामंडळाचे कार्यालयदेखील सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.प्रत्येक जिल्ह्यात मराठा विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहमराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील व व्यावसायिक अभ्यासक्रमात शिकणाºया विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह बांधण्यात येईल, अशी घोषणा चंद्रकांत पाटील यांनी केली. यासंदर्भात जागादेखील उपलब्ध करून देण्यात येईल व सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत असलेल्या व अर्धवट बांधकाम झालेल्या इमारतींचादेखील विचार करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. सोबतच छत्रपती शाहू महाराज शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती, एक लाख रुपये उत्पन्न असलेल्या पालकांच्या पाल्याला शहरात ३०, ग्रामीण भागात २० हजार रुपये राहण्याचा खर्च, जिल्हास्तरावर वसतिगृह प्रति विद्यार्थी दहा हजार रुपये अनुदान, या योजनादेखील जाहीर करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

टॅग्स :Nagpur Winter Session-2017नागपूर हिवाळी अधिवेशन-२०१७