शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आंदोलन; नागपुरात पोलिसांनी वाचविले आंदोलकांचे प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 10:17 IST

आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक गुरुवारी दुपारी १२.३० वाजता मानकापूर झोपडपट्टीजवळील रेल्वे रुळावर झोपले. यावेळी दिल्लीला जाणारी भरधाव रेल्वेगाडी जवळ आलेली असताना पोलिसांनी आपल्या जीवाची बाजी लावून या आंदोलकांना रेल्वे रुळावरून बाजूला केल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

ठळक मुद्देरुळावर झोपले होते १० आंदोलकमानकापूर रेल्वे रुळावरील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक गुरुवारी दुपारी १२.३० वाजता मानकापूर झोपडपट्टीजवळील रेल्वे रुळावर झोपले. यावेळी नागपूरवरून दिल्लीला जाणारी भरधाव रेल्वेगाडी जवळ आलेली असताना मानकापूर पोलिसांनी आपल्या जीवाची बाजी लावून या आंदोलकांना रेल्वे रुळावरून बाजूला केल्यामुळे मोठा अनर्थ टळला.नागपूर बंदचे आवाहन केल्यानंतर मराठा आंदोलक दुपारी १२.३० वाजता मानकापूर चौकाकडून जरीपटकाकडे जाणाऱ्या उड्डाणपुलावर गोळा झाले. तेथे ते टायर जाळून आंदोलन करीत होते. आंदोलक टायर जाळून रास्तारोको करीत असल्याचे मानकापूर पोलिसांना दृष्टीस पडताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. यावेळी आंदोलकांनी पोलिसांशी बाचाबाची केली.पोलिसांनी रास्तारोकोस मनाई केल्यामुळे आंदोलक उड्डाणपुलावरून खाली उतरले. मानकापूर झोपडपट्टीच्या शेजारी असलेल्या रेल्वे रुळाकडे आंदोलक सरसावले. यातील १० आंदोलक दिल्लीकडून नागपूरला येणाऱ्या रेल्वे रुळावर झोपले. परंतु तेवढ्यात नागपूरवरून दिल्लीकडे भरधाव वेगाने रेल्वेगाडी जात असल्याचे पाहून आंदोलक त्या रुळावरून उठून नागपूर-दिल्ली मार्गाच्या रेल्वे रुळावर झोपले. यावेळी नागपूरवरून दिल्लीकडे जाणारी सुपरफास्ट रेल्वेगाडी अगदी जवळ येऊन ठेपली होती. परंतु आंदोलक रुळावरच झोपून होते.तेवढ्यात मानकापूरचे पोलीस निरीक्षक महेश चव्हाण आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रुळावर झोपलेल्या आंदोलकांना उजव्या आणि डाव्या बाजूला ओढल्यामुळे मोठा अनर्थ टळला. दरम्यान, महेश माने, दीपक इंगळे, तेजसिंह शिर्के, प्रशांत मोहिते, मनोज जाधव या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. नंतर त्यांची ओपन जेलमध्ये रवानगी करण्यात आली.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा