शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आंदोलन; नागपूर एसटी महामंडळाला ४० लाखांचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 10:59 IST

मराठा आंदोलनामुळे नागपूर एसटी महामंडळाला ४० लाखांचा फटका बसला. 

ठळक मुद्देएक बस फोडली७५ टक्के बसेस ठप्प८८७ बसफेऱ्या रद्द

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मराठा आंदोलनामुळे नागपूर एसटी महामंडळाला ४० लाखांचा फटका बसला. आंदोलकांनी बुधवारी रात्रीच गणेशपेठ आगारात उभी असलेली अंबड डेपोच्या बसच्या काचा फोडल्या. त्यामुळे पोलिसांनी एसटी वाहतूक बंद करण्याच्या सूचना केली. तिचे एसटी महामंडळाने पालन केले. नागपूर विभागातील ७५ टक्के बसेस ठप्प झाल्या. एकूण ८८७ बसफेऱ्या रद्द करण्याची पाळी एसटी महामंडळावर आली. यामुळे नागपूर विभागात एसटी महामंडळाला तब्बल ४० लाखांचा फटका बसला.बंदमुळे एसटी महामंडळाच्या वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. बंदची आधीच माहिती असल्यामुळे बहुतांश प्रवाशांनी गुरुवारी प्रवासाचा बेत रद्द केला होता. तर बसस्थानकावर आलेल्या प्रवाशांना बसेस बंद असल्याचे समजल्यामुळे आल्यापावली परत जाण्याची पाळी आली. सकाळी ६ ते ८ दरम्यान नागपूर विभागात काही मोजक्याच बसेस आगाराबाहेर पडल्या. परंतु मार्गात काही बसेसची हवा आंदोलकांनी सोडल्यामुळे सकाळी ९ वाजेनंतर विभागातील एकही बस डेपोबाहेर न काढण्याचा निर्णय एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी घेतला. नागपूर शहरात सीताबर्डी, एलआयसी चौक आणि कॉटन मार्केट परिसरात बसेसची हवा आंदोलकांनी सोडली.नागपूर विभागात एसटी महामंडळाच्या १३४४ बसफेºयापैकी ८८७ फेºया रद्द करण्यात आल्या. यात १ लाख १७ हजार ५२९ किलोमीटरच्या फेऱ्या महामंडळालारद्द कराव्या लागल्या. नागपूर विभागात एकूण ४० लाखांचा फटका महामंडळाला बंदमुळे बसला.बंदमुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होऊन त्यांना खासगी प्रवासी वाहतुकीकडे वळावे लागले. सायंकाळी ६ वाजता एसटी महामंडळाने आपल्या बसेस वाहतुकीसाठी सोडणे सुरू केल्यामुळे प्रवाशांनी बसस्थानकाकडे धाव घेतल्याचे चित्र होते.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा