लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आजन्म कारावासाची शिक्षा झालेला माओवादी जी. एन. साईबाबा याचा शिक्षेवर स्थगिती व जामीन मिळण्याचा अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी फेटाळून लावला. न्यायमूर्तीद्वय अतुल चांदुरकर व अमित बोरकर यांनी हा निर्णय दिला.नागपूर मध्यवर्ती कारागृहामध्ये कोरोना संक्रमण वाढले आहे. अनेक कैद्यांना कोरोनाची लागण झाली आहे. कारागृह प्रशासन कैद्यांच्या आरोग्याची योग्य काळजी घेत नाही. त्यामुळे शिक्षा स्थगित करून जामीन देण्यात यावा असे साईबाबाचे म्हणणे होते. राज्य सरकारने साईबाबाचे आरोप फेटाळून लावले. साईबाबाला अंडा सेलमध्ये ठेवण्यात आले आहे. त्या ठिकाणी एकही कोरोना रुग्ण नाही. साईबाबाच्या आरोग्याची योग्य काळजी घेतली जात आहे. त्याने यापूर्वीदेखील आरोग्याच्या कारणावरून जामीन मागितला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता त्याला जामीन नाकारण्यात आला होता, असे सरकारने सांगितले. त्यानंतर उच्च न्यायालयाने यासह विविध बाबी लक्षात घेता वरीलप्रमाणे निर्णय दिला. ७ मार्च २०१७ रोजी गडचिरोली सत्र न्यायालयाने साईबाबाला बेकायदेशीर कृती प्रतिबंधक कायद्यांतर्गत आजन्म कारावासाची कमाल शिक्षा सुनावली आहे. तो सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात आहे. साईबाबातर्फे अॅड. निहालसिंग राठोड तर, सरकारतर्फे अॅड. प्रशांत सत्यनाथन यांनी कामकाज पाहिले.
माओवादी साईबाबाचा जामीन अर्ज फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 21:01 IST
आजन्म कारावासाची शिक्षा झालेला माओवादी जी. एन. साईबाबा याचा शिक्षेवर स्थगिती व जामीन मिळण्याचा अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी फेटाळून लावला. न्यायमूर्तीद्वय अतुल चांदुरकर व अमित बोरकर यांनी हा निर्णय दिला.
माओवादी साईबाबाचा जामीन अर्ज फेटाळला
ठळक मुद्दे हायकोर्टाचा दणका : कोरोनाचे कारण दिले होते