शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

मालामाल बनविण्याचे स्वप्न दाखवून नागपुरातील अनेकांना बनविले कंगाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 00:51 IST

मल्टिलेव्हल मार्केटिंग कंपनीच्या संचालकांनी अल्पावधीतच मालामाल बनविण्याचे स्वप्न दाखवून अनेकांना कंगाल केले. कोट्यवधी रुपये हडपून कंपनीचे संचालक पळून गेल्याने संबंधितांमध्ये प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देएमएलएम कंपनीकडून अनेकांना गंडा : महिलेसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मल्टिलेव्हल मार्केटिंग कंपनीच्या संचालकांनी अल्पावधीतच मालामाल बनविण्याचे स्वप्न दाखवून अनेकांना कंगाल केले. कोट्यवधी रुपये हडपून कंपनीचे संचालक पळून गेल्याने संबंधितांमध्ये प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे. या प्रकरणी प्रतापगनगर पोलिसांनी दोन महिलांसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.जयेंद्र बाळू पवार (वय ४५, नॅशनल प्रमोटर), ऋतुजा जयेंद्र पवार, राजकुमार शर्मा, मेघना पवार अशी आरोपींची नावे आहेत. त्यांनी आॅगस्ट २०१८ मध्ये प्रतापनगरातील कोतवाल नगरात सुपर लाईफ हेल्थ केअर कंपनी सुरू केली होती. कंपनीत अल्पावधीत दामदुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांना झटपट श्रीमंत होण्याचे स्वप्न दाखवले.विदेशी सफर आणि मुलांना मोफत शिक्षण देण्याची विशेष ऑफर देऊन आरोपी नवनवीन ग्राहकांना जोडण्याचे (मल्टी मार्केटिंग) तंत्र गुंतवणूकदारांना सांगत होते. सुरुवातीला कंपनीच्या आरोपी संचालकांनी गुंतवणूकदारांना दिलेल्या आश्वासनाची पूर्ती केल्याने ग्राहकांचा विश्वास वाढला. त्यामुळे गुंतवणूकदारांनी आपल्या नातेवाईकांना, ओळखीच्यांना सुपर लाईफमध्ये रक्कम गुंतवण्यास बाध्य केले. अशा प्रकारे शेकडो ग्राहकांकडून कोट्यवधी रुपये जमा करणाऱ्या कंपनीच्या संचालकांनी गेल्या आठ महिन्यापासून परतावा देणे बंद केले. परिणामी कुजबुज सुरू झाली. प्रारंभी तांत्रिक अडचणीचे नाव घेणाºया आरोपींनी नंतर मात्र ग्राहकांना प्रतिसाद देणे बंद केले. एवढेच काय, कार्यालयाला कुलूप ठोकून आरोपी पळून गेले. त्यांनी फसवणूक केल्याचे उघड झाल्यामुळे हवालदिल झालेल्या ग्राहकांनी एकमेकांवर (कंपनीशी जोडणारांवर) रोष व्यक्त करण्यास सुरुवात केली. शेवटी अनेकांनी प्रतापनगर ठाण्यात तक्रार नोंदवली. अनेकांच्यावतीने पोलिसांनी सचिन चौधरी (रा. पांडे ले-आऊट) यांची तक्रार नोंदवून आरोपीजयेंद्र बाळू पवार, ऋतुजा जयेंद्र पवार, राजकुमार शर्मा, मेघना पवार या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यांचा शोध घेतला जात आहे.आरोपी पुण्यात की मुंबईत ?आरोपींनी त्यांच्या कंपनीचे मुख्यालय पुण्याच्या स्वारगेट परिसरात असल्याचे सांगितले होते. त्यात आरोपी जयेंद्र पवार हा स्वत:ला नॅशनल प्रमोटर म्हणवून घ्यायचा. त्याची पत्नी म्हणून आरोपी ऋतुजा पवार (वय ३८) कंपनीची सर्वेसर्वा, मुलूक वरिष्ठ ऊर्फ राजकुमार शर्मा (वय ३८) हा स्वत:ला सीएमडी तर मेघना चव्हाण (वय ३५) ही उच्चाधिकारी म्हणून गुंतवणूकदारांशी बोलायची. आता ते कुठे पळून गेले. ते पुण्यात आहेत, नाशिक की मुंबई त्याचा पोलीस शोध घेत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीInvestmentगुंतवणूक