शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

नागपूर मनपावर अनेक मोर्चांची धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 00:25 IST

दीर्घ कालावधीनंतर आयोजित महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्तापक्ष व विरोधकांत विविध मुद्यांवरून संघर्षाचे वातावरण असतानाच सभागृहाबाहेरही विविध प्रश्नांवरून राजकीय पक्षाच्या नेतृत्वात मोर्चे काढण्यात आले. नागनदी सौंदर्यीकरणाला विरोध दर्शविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व जय जवान जय किसान संघटनेतर्फे मोर्चा काढण्यात आला. तर पारडी भागातील तलमले यांच्या १८ एकर जमिनीवरील आरक्षण हटवून भूमाफियांना विकण्याच्या विरोधात मोर्चा काढून प्रशासनाच्या विरोधात जोरदार नारेबाजी करण्यात आली. बंटी शेळके यांचे सदस्यत्व रद्द करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आल्याच्या विरोधात युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार नारेबाजी केली. आम आदमी पार्टीतर्फे महापौरांच्या विरोधात निदर्शने क रण्यात आली.

ठळक मुद्देनागनदी सौंदर्यीकरण, जमीन आरक्षण बदलाला विरोध

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दीर्घ कालावधीनंतर आयोजित महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्तापक्ष व विरोधकांत विविध मुद्यांवरून संघर्षाचे वातावरण असतानाच सभागृहाबाहेरही विविध प्रश्नांवरून राजकीय पक्षाच्या नेतृत्वात मोर्चे काढण्यात आले. नागनदी सौंदर्यीकरणाला विरोध दर्शविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व जय जवान जय किसान संघटनेतर्फे मोर्चा काढण्यात आला. तर पारडी भागातील तलमले यांच्या १८ एकर जमिनीवरील आरक्षण हटवून भूमाफियांना विकण्याच्या विरोधात मोर्चा काढून प्रशासनाच्या विरोधात जोरदार नारेबाजी करण्यात आली. बंटी शेळके यांचे सदस्यत्व रद्द करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आल्याच्या विरोधात युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार नारेबाजी केली. आम आदमी पार्टीतर्फे महापौरांच्या विरोधात निदर्शने क रण्यात आली.पुनर्वसनाशिवाय नागनदी प्रकल्प राबवानागनदी सौंदर्यीकरण प्रकल्पासाठी नदीकाठाच्या दोन्ही बाजूकडील १५ मीटर जागा ताब्यात घेतली जाणार आहे. प्रकल्पामुळे हजारो नागरिक बाधित होणार असल्याने पुनर्वसनाशिवाय प्रकल्प पूर्ण होईल, असा अभ्यासपूर्ण प्रकल्प आराखडा तयार करण्यात यावा, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिल अहिरकर, महापालिकेतील पक्षाचे गटनेते दुनेश्वर पेठे व जय जवान जय किसानचे नेते प्रशांत पवार यांच्या नेतृत्वात हजारो झोपडपट्टीधारकांनी महापालिकेच्या महाल येथील टाऊ न हॉलवर मोर्चा काढण्यात आला. नागनदी सौंदर्यीकरण प्रकल्पासाठी दोन्ही बाजूची १५ मीटर जागा अधिग्रहित केली जाणार आहे. यामुळे हजारो रहिवासी व झोपडपट्टीधारक बेघर होणार आहे. त्यामुळे पुनर्वसनाशिवाय हा प्रकल्प राबविण्यात यावा, यासाठी पूर्व नागपुरातील हिवरीनगर येथून मोर्चा काढून टाऊ न हॉलवर धडक देण्यात आली. यावेळी अनिल अहिरकर, दुनेश्वर पेठे व प्रशांत पवार आदींनी मार्गदर्शन केले. शिष्टमंडळाने महापौर नंदा जिचकार यांना निवेदन देऊन प्रकल्प पुनर्वसनाशिवाय राबविण्याची मागणी केली. आंदोलनात विभागीय अध्यक्ष रवींद्र इटकेलवार,प्रकाश मेश्राम, शब्बीर विद्रोही, रियाज सय्यद, चेतन तोतडे, शरद शाहू, राजू भोयर, रियाज शेख, नरेंद्र शाहू यांच्यासह शेकडो झोपडपट्टीधारक सहभागी झाले होते.पुनर्वसनानंतरच प्रकल्प राबविणारनागनदी सौंदर्यीकण प्रकल्पात बाधित होणाऱ्यांचे आधी पुनर्वसन करण्यात येईल. त्यानंतरच हा प्रकल्प राबविला जाणार आहे. कुणालाही विस्थापित करून हा प्रकल्प राबविला जाणार नाही, अशी भूमिका केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची असल्याचे महापालिकेतील सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांनी स्पष्ट केले. नागनदी सौंदर्यीकरणाचा प्रस्ताव स्थापत्य समितीकडे अभ्यासासाठी परत पाठविण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.जागेवरील आरक्षण बदलू देणार नाहीपारडी दहनघाटलगत सरस्वती तलमले यांच्या मालकीच्या जमिनीवर दहनघाट, शाळा, बाजार, रुग्णालय यासाठी विकास आराखड्यात जागा आरक्षित आहे. परंतु महापालिके च्या अधिकाऱ्यांसोबत संगनमत करून १८ एकर जागेवरील आरक्षण हटविण्याचा प्रयत्न सुरू आहे. याविरोधात काँग्रेसचे नगरसेवक पुरुषोत्तम हजारे यांच्या नेतृत्वात पारडी ते महाल असा पायदळ मोर्चा काढण्यात आला. मोर्चात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. या जागेवरील आरक्षणात बदल केला जाणार नाही, असे आश्वासन महापौर नंदा जिचकार यांनी मोर्चेकरांना दिले. मोर्चात नरहरी तडस, रूपचंद मार्कंडे, विजू लारोकर, चंदू पांडे, राजू महाजन, सिंधू मानवटकर, ललिता साहू, रजिया खान, रवी केळझरे, पृथ्वी मोटघरे, नरहरी धोरटे, विकास तितरमारे, प्रवीणचंद थडमाके यांच्यासह हजारो नागरिक सहभागी झाले होते.युवक काँग्रेसची नारेबाजीकाँग्रेसचे नगरसेवक बंटी शेळके यांच्या निलंबनाचा प्रस्ताव सभागृहात पारित करण्यात आल्याच्या विरोधात युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी टाऊ न हॉलबाहेर प्रशासनाच्या विरोधात नारेबाजी केली. आंदोलनात प्रदेश महासचिव नेहा निकोसे,प्रदेश सचिव भूषण मरसकोल्हे,भारद्वाज,पूर्व नागपूर युवा काँग्रेस अध्यक्ष अक्षय घाटोळे,पश्चिम नागपूर अध्यक्ष मंगेश बढेल,दक्षिण नागपूर अध्यक्ष प्रशांत धोटे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.‘आप’ने मागितला महापौरांचा राजीनामामहापौर नंदा जिचकार यांनी विदेश दौºयात स्वत:च्या मुलाला सोबत नेल्याने आम आदमी पार्टीने याविरोधात टाऊ न हॉलसमोर निदर्शने करून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. आंदोलनात राजीव म्हैसबडवे, रविकांत वाघ, दीपक साने, राहुल वासनकर, राजेश पौनीकर यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. याची माहिती मिळताच राष्ट्रप्रेमी युवक दलाचे अध्यक्ष बाबा मेंढे आपल्या समर्थकांसह पोलीस स्टेशनमध्ये पोहचले. नैतिकतेच्या आधारावर महापौरांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी मेंढे यांनी केलीे. 

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाMorchaमोर्चा