शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मानकापूर क्रीडा संकुलाचा होणार मेकओव्हर, ६८३ कोटींचा विकास आराखडा तयार

By जितेंद्र ढवळे | Updated: January 29, 2024 20:02 IST

क्लब हाऊस अन् शॉपींग कॉम्प्लेक्स

नागपूर: मानकापूर क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा तसेच वाणिज्यीक सुविधा उभारणीच्या मुळ कामाकरिता ४७३ कोटी रुपये व विमा, जीसटी व इतर सेवा शुल्क मिळून एकूण ६८३ कोटी रुपयांचा आराखडा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मान्यतेने अंतिम करण्यात आला आहे. हा प्रस्ताव प्रशासकीय मान्यता व निधी उपलब्धतेसाठी शासनाकडे सादर करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी केल्या.

विभागीय क्रीडा संकुल कार्यकारी समितीची बैठक विभागीय आयुक्त कार्यालयात सोमवारी आयोजित करण्यात आली होती. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, क्रीडा उपसंचालक शेखर पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक, क्रीडा प्रशिक्षक विजय मुनिश्वर पियुष अंबुलकर आदी याप्रसंगी उपस्थित होते.

नागपूर येथे ऑलम्पीक व एशीयन क्रीडा स्पर्धांच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय दर्जाचे अद्यावत क्रीडा संकुल उभारण्याच्या कामाला गती मिळण्यासाठी निधी उपलब्धतेनुसार क्रीडा सुविधेची कामे प्राधान्याने करण्याचे व इतर कामे टप्प्याटप्याने पूर्ण करण्याचे आयुक्त बिदरी यांनी आराखड्याचा आढावा घेताना सांगितले. तर जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांनी सर्व कामे आंतरराष्ट्रीय मानकानुसार समाविष्ठ करण्याच्या सूचना दिल्या.

काय आहे अंतिम आरखड्यात?अंतिम आराखड्यानुसार क्रीडा सुविधांचे बळकटीकरण, स्पोर्ट्स क्लब, स्पोर्ट्स सायन्स सेंन्टर, साहसी क्रीडा प्रकारासाठी सुविधा, अद्यावत फुटबॉल स्टेडियम, हॉकी ॲस्ट्रोटर्फ, अद्यावत ॲथलेटीक्स स्टेडीयम, टेनिस कोर्ट्स, मल्टीजीम, स्पोर्ट्स एज्युकेशन ॲण्ड इनफॉरमेशन सेंटर, आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्पोर्ट्स एक्सलन्स सेंटर, ऑलम्पिक साइज जलतरण तलाव, कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, कुस्ती, आर्चरी, शुटींग, फेंन्सींग, स्क्वाश, बॉक्सींग, जुडो, कराटे, तायक्वांडो, टेबल टेनिस, बास्केटबॉल, सॉफ्टबॉल, हॅन्डबॉल, क्रीकेट व आवश्यकतेनुसार इतर खेळांच्या सुविधा, तसेच एकूण १२०० खेळाडूंकरिता निवास व्यवस्था, ७०० वाहनांकरिता पार्कींग व त्यावर सोलर विद्युत प्रणाली उभारण्यात येणार आहे.

क्लब हाऊस अन् शॉपींग कॉम्प्लेक्सक्रीडा सुविधा व सदर संकुल उभारणी नंतर त्याचा व्यवस्थापनाचा खर्च भागवण्यासाठी वापरा व हस्तातर तत्वार क्लब हाऊस, शॉपींग कॉम्प्लेक्स, तारांकीत हॉटेल, स्पोर्टस् क्लब आदी वाणिज्यीक प्रकल्प उभारण्याचा देखील आराखड्यात समावेश आहे.

टॅग्स :nagpurनागपूर